कोल्हापूर न्यूज नेटवर्क
१९८२ ची जुनी पेन्शन मिळणेसाठी शुक्रवार दि. २० मार्च रोजी होणाऱ्या अमरण उपोषणास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी पाठींबा देण्याचा निर्णय आज रोजी विद्याभवन कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड होते. या बैठकीस मार्गदर्शन शिक्षक नेते दादा लाड यांनी केले.
१९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळणेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर गेली १५ दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शुक्रवार दि २० मार्च रोजी पासून साखळी अमरण उपोषण सुरू केले जाणार आहे. या अमरण उपोषणास सुदेश जाधव व राजाराम कोठावळे यांच्या पासून सुरुवात केली जाणार आहे. या दिवशी दुपारी २.३० वाजता या अमरण उपोषणाला पाठींबा देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी महावीर गार्डन मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले.
या बैठकीस चेअरमन राहूल पवार, सचिव आर. वाय. पाटील, व्हा. चेअरमन रवींद्र मोरे, सुधाकर निर्मळे, श्रीकांत पाटील, सागर चुडाप्पा, राजेश वरक, शिवाजी कोरवी, प्राचार्य सचिन कोंडेकर, प्रकाश स्वामी, शिवाजी माळकर, अशोक पाटील, मनोहर पाटील, दत्तात्रय जाधव आदी मान्यवरांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त बैठकीत बोलतांना अध्यक्ष एस. डी. लाड शेजारी दादा लाड, राहूल पवार व अन्य मान्यवर.
--------------


