कोल्हापूर न्यूज / वि.रा .भोसले
खोमेनी यांची हत्या झाली. त्याबरोबर अनेक मोठे नेते ही गेले. त्याचे प्रमुख कारण आधी समजून घ्या. धर्माचा बुरखा पांघरलेला खोमेनी एक क्रूर नेता होता.त्याने स्त्रियांना बुरखा सक्तीचा केला. त्यावर आंदोलन करणाऱ्या सुधारणा वादी महिलांवर गोळया घातल्या.महिलांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. तिथल्या टी व्ही वरील महिला अँकर सुद्धा बुरखाधारी होत्या.स्त्री ही पुरुषाची फक्त भोग वस्तू आहे असा अत्यंत गलिच्छ विचार मांडणारा तो नेता होता. राज्य चालवीणारे सर्व नेते दाढी धारी व टोपी धारीच पाहिजेत ही अट होती. पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असूनही तेथे सुधारणावादी नेते आहेत. स्त्रियांना स्वातंत्र्य तरी आहे. जगाची निम्मी लोक संख्या महिलांची आहे हे खोमेनी आणि त्याचे सहकारी विसरून गेलेत.स्त्री सन्मान झालाच पाहिजे.इराण ने या बाबतीत राष्ट्र चारशे वर्षे मागे नेले होते.
त्याने सुधारणावादी क्रांतीकारकाना फासावर लटकवले. कांहीना गोळया घातल्या. इस्रायल ने खोमेनीला मारायचे ठरवले होते. दुर्दैवाने शाळेतील मुले मारली गेली. ही घटना जितकी निंदनीय तितकीच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी निष्पाप मुलांची ढाल बनवणे सुद्धा निंदनीय आहे. खोमेनी स्वतः शिया पंथीय असल्याने जितके सुन्नी पंथीय युद्धात मारले जातील तेवढे त्याला हवेच होते. दगडाचे काळीज असलेला खोमेनी मारला गेला याचे दुःख करण्याचे कारण नाही. युद्धात शाळेची मुले मारली गेल्याने खोमेनीच्या बाजूने सहानुभूतीची लाट मात्र निर्माण झाली.ती दिशाभूल होती.
1979 साली तेथील सुन्नी पंथीय राजेशाही नष्ट करून शिया पंथी खोमेनी सत्ते वर आला. अजूनही तेथे सिया सुन्नी वाद सुरु आहे. खोमेनी ची हत्या झाल्यावर इराण मध्ये जल्लोष आणि आक्रोश दोन्ही पहायला मिळाले.इराण वर हल्ला करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खोमेनी सरकार परमाणू बॉम्ब करणार होते. या बॉम्ब ने आधी इस्राएल चा खात्मा करायचा व नंतर सुन्नी देशांचा.अतिरेकी विचारधारा असलेल्या नेत्यांच्या हाती अणूबाँम्ब आले तर काय होईल याची कल्पना करा. ऑपरेशन सिंदूर च्या वेळी पाकिस्तानी नेते अणूबाँम्ब बाहेर काढा म्हणतच होते. भारताने त्यांना भीक घातली नाही.
जगातला असला धार्मिक आतंकवाद संपवलाच पाहिजे. धर्माचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. त्याने आपला धर्म जरूर पाळावा. इतर धार्मियांचे किंवा पंथांचे गळे कापून मात्र तो स्वतःचा धर्म वाढवू नये.तेव्हा खोमेंनी साठी अश्रू ढाळण्याचे कारण नाही. शांतता वादी देशांनी तर नाहीच नाही.भारता वर आक्रमण करून दिल्ली लुटणारे क्रूर नादीर शहा व तैमूर लंग हे सुद्धा पर्शिया चे म्हणजे आताच्या इराणचे होते. त्यावेळी तेथे वाळूशिवाय कांही नव्हते. आता इराणसह सर्व आखाती देश तेलाने इतके समृद्ध झाले आहेत की त्यांच्या मोटारीना सोन्याने मढवलेले आहे. त्यात इराण (पूर्वीचा पर्शिया )धार्मिक अतिरेकी झाला आहे.खोमेनीची हत्या त्यातून झाली आहे.तेंव्हा त्याच्यासाठी छाती बडवत बसू नका.
-----------------------------------

