शिक्षण क्षेत्रात खळबळ : तीन तत्कालीन शिक्षण उपसंचालक , दोन लेखाधिकारी , चार अधीक्षक , आणि ८४१ शिक्षकावर गुन्हे दाखल

Kolhapur news
By -

 

                


    नाशिक : नाशिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडी प्रणालीत मोठा गैरप्रकार उघड झाला असून नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शालार्थ प्रणाली मध्ये बनावट आयडी तयार करून शासनाची सुमारे १५०  कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


  नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर विजयराव देवरे यांनी याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .या प्रकारे तत्कालीन तीन शिक्षण उपसंचालकासह ८०१ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी , मुख्याध्यापक आणि संस्थांचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . या गुन्ह्यात नितीन उपासनी ,भाऊसाहेब चव्हाण ,नितीन वच्छाव यांचा संशियतामध्ये समावेश आहे , हा प्रकार सन 2019 ते 2025 या कालावधीत घडल्याची प्राथमिक तपासात समोर आले आहे. 


 राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शालार्थ आयडी अनिवार्य आहे ,मात्र नाशिक सह धुळे , जळगाव, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेल्या नाशिक विभागात कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता किंवा नस्ती उपलब्ध नसताना बनावट आदेशांच्या आधारे ८४१ जणांची शालार्थ आयडी प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे, या माध्यमातुन शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयांचे वेतन बेकायदेशीरपणे लाटण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


  या घोटाळ्यात तत्कालीन प्रभारी उपसंचालक नितीन बच्छाव, शिक्षण उपसंचालक राहिलेले नितीन उपासनी आणि डॉ भाऊसाहेब चव्हाण यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे , या व्यतिरिक्त दोन लेखाधिकारी आणि संबंधित जिल्ह्याचे अधीक्षक यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. 


दरम्यान राज्याच्या शिक्षण आयुक्त यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची एसआयटी मार्फत पडताळणी करण्यात आली होती, ज्या कर्मचाऱ्यांची शालार्थ आदेश कार्यालयीन जावक क्रमांकाची जुळत नाहीत किंवा ज्यांनी आपले आदेश पोर्टलवर अपलोड केले नाहीत अशा ८९२ संशयास्पद आयडी पैकी ८४१ जणांवर थेट कारवाई केली आहे. 


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला असून गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकावर पुढे काय कारवाई होते याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


                 --------------------