कोल्हापूर न्यूज नेटवर्क
काही अधिकारी स्तुती प्रिय असे असतात. हारतुरे, बुके स्वीकारायला त्यांना खुप आवडते. समारंभा नंतर कार मध्ये घालून घरी घेऊन जातात. पत्नी समोर कॉलर ताठ करून शेखी मिरवतात. या सर्व सोपस्कारांना फाटा देऊन एस टी चे कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक (DC) अमोल गोजारी यांनी त्यांच्या सत्कार स्वागताचा बुके बस स्थानकाचे स्वच्छता कर्मचारी आनंदा लहू कांबळे यांना संमर्पित केला.
विभाग नियंत्रक गोजारी यांनी मुरगूड बस स्थानकास भेट दिली. एस टी च्या स्वच्छता अभियानाचे नाव आहे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान.या अभियानांतर्गत डी सी गोजारी हे स्वतः जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांना कानिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेटी देतात. या भेटी एक तास आधी सूचना देऊन किंवा अचानक सुद्धा असतात. बस स्थानकातील स्वच्छता व सुविधा यांची पहाणी अभियाना तील निकषानुसार केली जाते. विशेष म्हणजे बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा न करता बस चे प्रवासी व पत्रकार यांनाच या बाबत प्रश्नावली दिली जाते.
मुरगूड बस स्थानकात त्यांनी कांही प्रवासी व पत्रकार यांचेशी समक्ष चर्चा केली. मुरगूड पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे व लाईव्ह मराठी चे सर्जेराव भाट तसेच कांही प्रवासी यांचेशी त्यांनी समक्ष चर्चा केली. बस स्थानकप्रमुख बाबुराव परीट, गारगोटीचे आगार प्रमुख चे (डेपो मॅनेजर ) सागर पाटील यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुष्प गुच्छ दिला. स्वछता कर्मचारी लहू कांबळे यांना बोला वून घेऊन डी सी नी तो गुच्छ त्यांना समर्पित केला.
बस स्थानकाची स्वच्छता पाहून ते खुष झाले होते. बस स्थानकात बसेस येत होत्या जात होत्या. स्थानक प्रमुख परीट ध्वनी क्षेपका वरून नियंत्रण करत होते. गारगोटी डेपो चे अधिकारी सुद्धा अदबीने स्थानकात वावरत होते.सर्व कामे सुरळीत सुरु होती.पहाणी संपली आणि डी सी खुष होऊन निघून गेले. हार तुरे, बुके त्यांनी गाडी तून न नेता घाम गाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्पण केले.
हा आदर्श इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा घेण्यासारखा आहे अशी चर्चा स्थानकातील प्रवासी करत होते.
------------------


