कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले (प्रतिनिधी ) : मौजे वडगाव ते कोल्हापूर के. एम.टी. बस सेवा काही दिवसा पासून खंडित झाली असून ती पूर्ववत सुरू करावी अशी मागणी खा. धैर्यशील माने यांच्या शिफारस पत्राद्वारे जि.प. सदस्य अतिश शिंगे व मौजे वडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेचे परिवहन सभापती सत्यजित जाधव यांच्याकडे केली .
मागील काही दिवसा पासून कोरोनाच्या कारणास्तव व कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण देत मौजे वडगावात येणाऱ्या बसच्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत . त्यामुळे विद्यार्थी , व्यापारी , तसेच नोकरवर्ग यांची गैरसोय होऊ लागली असून मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे .
यावेळी शिष्टमंडळात जि. प. सदस्य अतिश शिंगे उपसरपंच स्वप्नील चौगुले, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.प . सदस्य सुनिल खारेपाटणे , शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रा.पं सदस्य सुरेश कांबरे, शिवसेना उपतालूकाप्रमुख (ओबीसी) व ग्रा पं . सदस्य रघूनाथ गोरड , माजी सदस्य अविनाश पाटील, उपस्थित होते .
----------------------------------
सध्या बसेसची संख्या कमी आहे तरी सुद्धा येणाऱ्या १५ दिवसात किमान दिवसातून ३ ते ४ फेऱ्या सुरू करू उर्वरित इलेक्ट्रीक बस आल्यानंतर संपूर्ण फेऱ्या सुरू करू .
सत्यजित जाधव
परिवहन सभापती को. म. न. पा.
----------------------------------

