कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल येथील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या दिवटे या ३४ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक सेवेनंतर बजावल्यानंतर सेवानिवृत्त झाल्या . यानिमित्त विद्यालयात त्यांच्या सन्मानार्थ भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात सौ. दिवटे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेल्या.
कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सौ. विद्या दिवटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
निरोपपर भाषणात सौ. दिवटे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट अत्यंत भावनिक वातावरणात झाला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे , शहाजी गायकवाड , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच पालक यांच्यासह इतर मान्यवर , श्री दिवटे व मित्र परिवारातील कुटुंबीय उपस्थित होते.
---------------------------

