कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबई :भायखळा येथील मुबंई सेंट्रल परिसर. कोल्हापूर हून रातराणीने आलेला एक प्रवासी बस मधून उतरला. हातात ओझं होतं.. स्टॅन्ड बाहेर एक टॅक्सी होती.ड्राईव्हर दाढीवाला मुस्लिम होता. प्रवासी मराठा होता. त्यांने ड्राईव्हर ला विचारले व्ही टी जाना हैं.
व्ही टी नव्हे सी एस टी म्हणा. छत्रपती शिवाजी टर्मिनस. तो मुस्लिम ड्राईव्हर चक्क मराठीत बोलत होता. कोल्हापूरकर एकदम खुश.
" चला तर. मराठी येत नसेल म्हणून मी हिंदीत विचारले."
"जेथे आपण काम करून पोट भरतो त्या गावची भाषा आपण शिकली पाहिजे. त्यात कठीण ते काय!, मोडकी तोडकी तरी भाषा बोलता येईल ना!"
तो गोरा मुस्लिम ड्राईव्हर छान मराठी बोलत होता. उत्तर भारतीय असावा. मुंबईत येऊन त्याला 25 वर्षे झाली होती.मुलं मुंबईतच उच्च शिक्षण घेत होती. या महानगरीने त्याला नवे जीवन दिले होते.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर सुद्धा आहे. भारतातल्या प्रत्येक राज्यातील लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येतात. वाहन चालक तर खुप मोठया संख्येने आहेत.मुंबई ने सर्वासाठी आपले बाहू पसरले आहेत.
सन 1964 पासून महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठीला मान्यता दिली आहे. राजधानी मुंबईला तर ती प्रथम लागू आहे.बंगाल मध्ये बंगाली,तामिळनाडू मध्ये तामिळ, गुजरात मध्ये गुजराती भाषेला सन्मान मिळतो तर महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठीला का मिळू नये.मुंबईत व्यवसाय करणाऱ्या वाहन चालकांना किमान व्यावहारिक मराठी बोलता यावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. कॉलर पकडून मराठीची सक्ती करण्याची वृत्ती परिवहन खात्याने ठेवलेली नाही. स्थानिक भाषेला प्राधान्य आणि सन्मान मिळालाच पाहिजे.
भाषेचा अडथळा उरला नाही तर व्यवहारातील वाद उरणार नाहीत. परिवहन खात्याच्या सूचना सुद्धा समजतील.वाहन चालकांसाठी मूलभूत मराठी प्रशिक्षणाचे मार्ग सुद्धा उपलब्ध असतील.हे प्रशिक्षण अगदी सोपे आणि अनिवार्य असेल. परवाना देताना किंवा नूतनीकरण करताना मराठी ज्ञानाचा निश्चित उपयोग होणार आहे.या व्यवसायातील सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मराठी भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून व्यवहाराच्या सुलभतेचे साधन आहे.प्रवाशांची बिंतक्रार सेवा हेच उद्दिष्ट असेल.जीवनदायीणी असलेल्या मुंबई च्या माय बोली शी प्रामाणिक रहावे हीच परिवहनची अपेक्षा आहे. सुलभता,आपलेपणा, विश्वासार्हता यासाठी. व्यावहारिक मराठी बोलायला शिका. तिचे ऋण जपा. एवढीच अपेक्षा.
-------------------

