कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी "कोल्हापूर फर्स्ट" उपक्रम

Kolhapur news
By -

 



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


    कोल्हापूरातील (हॉटेल पॅव्हिलियन) येथे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने प्रेरित "कोल्हापूर फर्स्ट" या उपक्रमाच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्तीनिमित्त विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.याप्रसंगी कोल्हापूर फर्स्टच्या वतीने  आमदार विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला.


कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातील विकासाची दिशा आणि नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी संकल्पना, पर्यटन वाढ, उद्योग क्षेत्राचा विस्तार, रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली.


तसेच शाहूवाडी तालुक्यातील सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारण्यात येणार आहे. या एमआयडीसी क्षेत्रात बाहेरील उद्योजकांनी जागेची मागणी केली आहे. या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना या एमआयडीसी क्षेत्रात उद्योगासाठी जागा घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले .


या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार, विविध शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे कोल्हापूरच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली आणि आगामी काळात कोल्हापूर जिल्हाला प्रगत, स्वच्छ आणि आधुनिक बनवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला...


यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर,खासदार धनंजय महाडिक,दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने (बापू),कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंन्द्र जैन,व्हा.चेअरमन ॲड.सर्जेराव खोत,व्हा.चेअरमन अमोल कोडोलीकर,व्हा.चेअरमन प्रताप पाटील,सचिव बाबासो कोंडेकर,सहसचिव उज्वल नागेशकर,सहसचिव सीएस जयदीप पाटील,खजनिस सीएस पद्मसिंह पाटील,सहखजनिस सीए नितीन हरगुडे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध असोशियनचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


                ----------------------