"महान व्यक्ती कधीच मरत नाहीत, त्यांचे विचार सदैव जिवंत राहतात." - सदाशिव तुकान

Kolhapur news
By -

 

            


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क


"महान व्यक्ती कधीच मरत नाहीत, त्यांचे विचार सदैव जिवंत राहतात "  म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या संविधानाच्या अविस्मरणीय कार्यामुळे आपल्यामध्ये आजही जिवंत आहेत असे प्रतिपादन कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य व वेदगंगा सेवा संस्थेचे चेअरमन सदाशिव तुकान यांनी केले. 


    नानीबाई चिखलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. 


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नानीबाई चिखली येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात समता, बंधुता आणि न्याय यांची जोपासना करण्याचा संकल्प व्यक्त केला. 


यावेळी बशीर नदाफ ,प्रभाकर मधाळे ,सुनील कांबळे , किरण कांबळे  यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. 


                ----------------------------