कोल्हापूर न्यूज नेटवर्क
एम जे इंटर नॅशनल स्कूल मुरगूड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. सलग 14 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा शाळेने याही वर्षी राखली आहे.
कु.स्वरा ऋषीकेश भराडे, 93.80 % गुण मिळवून प्रथम आली आहे. कु. संस्कृती अभिजित भोसले ही 93.20%गुण मिळवून दुसरी आली आहे. कु. प्रणोती संतोष तेली (92.60%) हिने तिसरा क्रमांक पटकवला आहे.
प्राचार्या जस्मिन जमादार व अध्यक्ष जावेद मकानदार यांनी विदयार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.
**************

