कोल्हापूर न्यूज नेटवर्क
2026ची आय.पी.एल ट्रॉफी कोण जिंकणार याची क्रिकेट रसिकांच्या मधील उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे.
रविवार दि. 31 मे रोजी आय पी एल चा अंतिम सामना होत आहे.रजत पाटीदार ची आर सी बी टीम आधीच फायनल ला पोचली आहे. स्टार क्रिकेटर विराट कोहली या टीम मध्ये आहे. यापूर्वी या टीम ने आय.पी.एल ट्रॉफी जिंकली आहे.
या टीम बरोबर अंतिम सामना खेळण्यासाठी कोणती टीम येणार याची पण उत्सुकता आहे.
गिल च्या नेतृत्वातील गुजरात टायटन आणि पराग च्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स टीम यातील विजेती टीम आर सी बी शी मुकाबला करणार आहे.
यापैकी कोण येणार?
अनेक क्रिकेट रसिकांच्या मते राजस्थान रॉयल्स हा संघ अंतिम फेरीत यावा असे वाटते.
याचे कारण 'वंडर बॉय 'वैभव सुर्यवंशी.
अवघ्या 15 वर्षाच्या या बिहारी युवकांने आय पी एल च्या शिडा मध्ये वादळ वारे भरले आहे. यंदाच्या मोसमात सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त षटकार आणि 14वर्षां पासून घुमत आलेला गेल चा आय पी एल मधील षटकारांचा उच्चांक वैभवने मोडला आहे.
सचिन तेंडुलकर सारख्या महान क्रिकेट विरांनी सुद्धा त्याचे कौतुक केले आहे. सर्व माध्यमांवर वैभवचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मोदींची मेलोडी मागे पडून आता वैभव चे षटकार घुमू लागले आहेत.
मुंबई इंडियन्स खुप मागे पडली.त्या टीम मधील दिग्गज रोहित शर्मा, बुमराह, हार्दिक पंड्या यांना सुद्धा रसिक विसरले आहेत. वैभवने बुमराहला सुद्धा सलग दोन षटकार मारले. त्यामुळे वैभव बद्दल सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.दिग्गज किंग कोहली सुद्धा अंतिम फेरीत त्यांची वाट पहातोय.
सामना दोन सिंहांचाच व्हावा असे क्रिकेट शौकिनांना वाटते. एवढेच नव्हे तर आयपीएलच्या संयोजकांना सुद्धा वाटते त्यामुळे अंतिम सामन्यात तिकिटांची प्रचंड विक्री होणार आहे.
हे कांही भविष्य नव्हे पण एक अंदाज आहे. विराट आणि वैभव ची गाठ पडणार असे दिसते. वैभव चा फॉर्म असाच राहिला तर आयपीएल ची ट्रॉफी राजस्थान रॉयल्स घेऊन जाणार असेही वाटते.
-----------------------

