निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त फोर जेआर ह्युमन राइट्स केअर ऑर्गनायझेशननचे सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन

Kolhapur news
By -

              

              
                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      


निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकीनिमित्त, फोर जेआर ह्युमन राइट्स केअर ऑर्गनायझेशनने सर्व इच्छुक उमेदवारांना शहराच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

एका प्रसिद्धीपत्रकात, संस्थेने म्हटले आहे की, निपाणी नगरपालिकेच्या इतिहासात निवडणुका नेहमीच शांततेत आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडल्या आहेत. आगामी निवडणुकीत ३१ प्रभागांमधून सुमारे २०० उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता असून, प्रत्येक उमेदवार निपाणीच्या प्रगतीत योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.


निवडणूक प्रक्रिया सुरू होताच सर्व पक्षीय, राज्यस्तरीय आणि अपक्ष उमेदवारांनी संयुक्तपणे बैठक घेऊन प्रमुख नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करत एक समान विकासाचा उपक्रम राबवावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.


    खालील मुद्द्यावर  निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घ्यावी. या बैठकीत खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून आपापला विकासाचा जाहीरनामा तयार करावा:


1)  जवाहर तलाव पुनरुज्जीवन: तलावातील गाळ काढणे व खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे.


2)  मूलभूत सुविधा : शहर व उपनगरातील सर्व रस्ते, स्ट्रीट लाईट, गटारी, नाले यांची दुरुस्ती व नव्याने बांधकाम.


3)  नियोजन: अतिक्रमण हटाव मोहीम व शहराचा सुधारित मास्टर प्लॅन तयार करणे.


4)  सुशोभीकरण: निपाणीच्या चारही प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण, बगीचे व सर्व खुल्या जागांचा विकास.


5) दत्त खुले नाट्यगृहाच्या जागेवर खोदण्यात आलेल्या तलावाचे बाबतीत ठोस निर्णय


6) गांधी हाॅस्पिटल मध्ये येणाऱ्या रूग्णांना तालुका पद्धतीच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी तात्काळ निर्णय


7) निपाणी शहरातील एकमेव ट्राफिक सिग्नल चालू करणे बाबत


8)  इतर प्रश्न: आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यांसह नागरिकांचे इतर शेकडो प्रलंबित प्रश्न.



             ---------------------------




-