कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील सुयश राजेंद्र नुल्ले याची भारतीय सैन्य दलात सब लेफ्टनंट पदावर निवड झाल्याने परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर सुयशने हे यश संपादन केले असून सब लेफ्टनंट पदावर नियुक्ती होणारा तो गावातील पहिलाच आहे.
लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या सुयशने बारावीनंतर आपल्या गुणवत्तेवर पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला होता . एनडीए मध्ये असताना ही प्रशिक्षण कालावधीमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने कोचीन येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच्या या यशामुळे चिखलीसह परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सुयशच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील तरुणांनाही सैन्य दलात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. 'देशसेवा हीच खरी सेवा' या भावनेतून त्याने मिळवलेले यश कागल तालुक्यासह जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना सुयश चे वडील राष्ट्रपती पदक निवृत्त ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांनी व्यक्त केली.
----------------------------- --



