जरांगे नी आता थांबायला हवं. मराठा समाजासाठी त्यांचे योगदान फक्त दहा टक्के.बाकीच्या 90 टक्क्यांचे काय?

Kolhapur news
By -

 

 


          काेल्हापूर न्यूज /  वि. रा .भाेसले



    मनोज जरांगे हे अंतरवाली मध्ये भर उन्हात मराठ्यांसाठी उपोषणास बसणार आहेत असे समजते.मराठा समाजाला ओ बी सी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे. सकल मराठा समाज संघटनेने अशी मागणी  केली नाही. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. जरांगे ज्यांच्यासाठी उपोषण करतात ते फक्त मराठवाड्यातील चार जिल्हे आहेत. म्हणजे जरांगे यांचे योगदान फक्त दहा ते अकरा टक्क्यांसाठीच आहे. बाकीच्या 32 जिल्ह्यांचे काय?.असा प्रश्न त्यांना कोणीही अजून विचारलेला नाही. 


 मराठवाडा हा पूर्वी हैदराबादच्या छत्राखाली होता. त्यामुळे तेथील मराठ्यांना निजामाने ओबीसी ठरवले होते. अवर्षण आणि जलश्रोत यांचा अभाव यामुळे मराठवाडा नेहमीच रखरखित राहिला आहे ही गोष्ट सर्वांनाच मान्य करायला हवी. त्यासाठी मोठाले कालवे किंवा पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या महापु रांचे पाणी मराठवाड्यात वळवणे हे उपाय महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहेत. मराठवाड्याला वगळून महाराष्ट्राचा विकास होऊच शकणार नाही. असे असताना फक्त मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यांसाठी आणि तेही नोकरीतील आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसतात ही गोष्ट उचित वाटत नाही.


 महाराष्ट्रात मराठा समाज एकूण 32 ते 35 टक्के आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा तो अग्रेसर असलेला समाज आहे. महाराष्ट्रातील बरेचसे साखर कारखाने आणि जमिनी मराठा समाजाच्या ताब्यात आहेत.आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यात 16 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत.


     असे असताना हा समाज आपल्याला कुणबी किंवा मागास म्हणून घेण्यात स्वेच्छेने  पुढे आलेला नाही. महाराष्ट्रातील इतर मराठा समाजाला आणि दिग्गज मराठा नेत्यांना सुद्धा जरांगे  यांचे हे आंदोलन संकुचित प्रवृत्तीचे वाटते.

 सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवलेले नाही. जे दहा टक्के आरक्षण आहे ते आर्थिक मागास साठी आहे. (EWS).


  त्यामुळे जरांगे हे सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांचे नेते ठरत नाहीत ते फक्त मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या प्पुरते मर्यादित आहेत आणि त्यांच्या मागण्या मागील उपोषणाच्या वेळी मान्य झाल्या आहेत. तेव्हा आता त्यांनी थांबावे. मतपेटीवर डोळा ठेवून असलेले नेते यावर फारसे बोलू शकणार नाहीत म्हणून हा लेख प्रपंच  आहे.


    

   

   गेल्यावेळी जरागे नी मुंबई मोर्चा काढला व सरकारकडून मागणी मान्य करून घेतली आहे. तेव्हा आता पुन्हा उपोषणाचा हट्टाहास करणे हे उचित वाटत नाही. त्यांच्या मागे जी संघटना आहे त्यांनी केवळ नोकरीसाठी म्हणून प्रयत्न न करता मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता व हरित  मराठवाडा यासाठी प्रयत्न करावेत असे वाटते.


           ------------------------