कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
भारत देशातल्या काही भोंदू बाबांनी ' बाबा 'या नावालाच बदनाम केले आहे.राम रहिम बाबा, आसाराम बापू,, अलीकडचा अशोक खरात, स्वतःला बाळूमामांचा अवतार म्हणणारा मनोहर मामा हे सगळे भोंदू बाबां होय. त्यांनी समाजासाठी कांहीही केले नाही. भोळ्या भाबड्या भक्तांना नादी लावून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. विषयासक्त वृत्तीतून महिलांच्या अब्रूशी खेळ खेळला आणि तुरुंगात गेले.
धिरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी असले काहीच केले नाही.ज्वलंत राष्ट्रप्रेम, थोरांच्या प्रति नितांत श्रद्धा,खणखणीत आवाज , प्रगल्भ अध्यात्मिक ज्ञान, काव्यमय भाषा, ह्रदयाला जाऊन भिडणारे शब्द आणि तमाम महिलांशी माता भगिनींचे नाते यामुळे ते अबाल वृद्धात अत्यंत लोकप्रिय झाले आहेत.
त्यांचे लाखो नव्हे कोट्यावधी भाविक भक्त(अनुयायी )आहेत. केवळ भारतात नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांनी हिंदू धर्माचा डंका निर्माण केला आहे.राष्ट्रपती द्रोपदी मुरमु, पंतप्रधासन नरेंद्र मोदी,, यांच्या सह अनेक मोठया व्यक्तींनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे. बागेश्वर धाम मार्फत मध्यप्रदेशात दोनशे कोटींच्या मोफत कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरु आहे. चारशे अनाथ मुलींचे कन्याविवाह केले. त्यांचे ते वधू पिता बनले.त्यांची ही विधायक कार्यें पाहून परवा भारताचे निवृत्त सरन्यायाधिश भूषण गवई यांनी सुद्धा सहकुटुंब भेट दिली.
त्यांचे कथा कथन म्हणजे केवळ पैसे मिळवण्याचा व्यवसाय नाही तर भारतातील हिंदूंचे संघटन करणे हा त्यांचा उद्देश आहे."जात पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई भाई अशी त्यांची घोषणा आहे." वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षापर्यंत त्यांनी प्रचंड प्रमाणात हिंदूंच्यात जागृती केली आहे.
महाराष्ट्रातल्या अंध श्रद्धा निर्मूलन वाल्यांना (अंनिस ) मात्र त्यांची बाबागिरी बाहेर काढण्याची खाज सुटली आहे. बागेश्वर बाबांचा पाच दिवसाचा कथा कथनाचा कार्यक्रम नागपूरात नुकताच पार पडला.हर हर महादेव,जय श्रीराम,सीताराम, बागेश्वर धाम, बजरंग बली च्या जयजयकारांने नागपूर दुमदुमून गेले. लाखो भाविकांनी पाचही दिवस मंडप खचाखच भरले होते.
असं असतांना अनिस वाल्यांना धिरेंद्र शास्त्रीना आव्हान द्यायची हुकी आली.त्यांची बाबागिरी सिद्ध करायची आहे म्हणे. त्यासाठी 10 पत्रकार घेऊन बसायचे आणि त्यांच्या समोर चाचण्या द्यायच्या म्हणे. कशाबद्दल?काय पाप केलंय त्यांनी? कोणाला फसवलंय त्यांनी? कोणत्या महिलेचा मान भंग केलाय? कसली भोंदू गिरी केलीय त्यांनी? त्यांनी एक महान कार्य केलंय. भारतातील हिंदूंची अस्मिता जागवली आहे.धर्म रक्षाणार्थ शस्र आणि शास्त्र, माला आणि भाला, तिलक आणि त्रिशूल सिद्ध ठेवण्याचा संदेश दिला आहे. राम नवमी मिरवणुकीवरील दगड फेक सहन करायची नाही, लव्ह जिहाद ला कडाडून विरोध करायचा, धर्मांतर होऊ देऊ नका. हनुमानाची शक्ती हिंदू धर्मात येऊ देत अशी शिकवण त्यांनी दिली आहे.
अनिस वाले हिंदूच आहेत. पण त्यांना प्रसिद्धीची खाज सुटली आहे. त्यांना एवढंच सांगावेसे वाटते की हिंदू धर्मा ऐवजी इतर धर्माची नुसती कळ काढून बघाच.सहिष्णू हिंदू धर्म तुम्हांला पोखरायचा आहे. बाबा बागेश्वर स्वतः अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत. हिंदूराष्ट्र हे त्यांनी साध्य मानले आहे. अनिस वाल्यांनी अशोक खरात च्या मागे जरूर लागावे. तेथे राष्ट्रीय भावना नाही.
मऊ गावलं की कोपरानं खणायचं ही वृत्ती ठेऊ नये.त्यांच्या दरबारात बसावे. प्रश्न जरूर विचारावेत पण राष्ट्र भक्ताचा अवमान करू नये. तुमची तेवढी पात्रताही नाही.
******************


