कोल्हापूर न्यूज नेटवर्क
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे (वय 53 वर्षे) यांचे गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्या नात होत्या तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या परिसरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शुक्रवारी एक मे 2026 रोजी सकाळी 9 ते सकाळी 11 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे.
-----------------------

