अंगारकी संकष्टी साठी मुरगूड हून दोन एस टी बसेस गणपती पुळ्याला रवाना.माजी नगराध्यक्ष व नूतन नगर सेवकांच्या हस्ते पूजन व फराळ वाटप.

Kolhapur news
By -

 



              

            


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


  प्रवाशांच्या सेवेसाठी लाल परी नेहमी सज्ज असते यांचा प्रत्यय आज अंगारकी संकष्टी दिवशी आला.मुरगूडहून आज दोन बसेस गणपती पुळे येथे रवाना झाल्या.

  या बसेसचे पूजन व  बसमधील भाविकांना  फराळ वाटप माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, नूतन नगरसेवक व गटप्रमुख सुहास खराडे, जेष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगुले, दीपक चौगुले इचे इत्यादींचे हस्ते झाले.


  प्राचार्य व्ही. आर. भोसले यांनी प्रास्ताविक करतांना मुरगूड बस स्थानकाच्या नूतनीकरण आणि गाळ्यांचा विषय मांडला. हे बस स्थानक म्हणजे मुरगूडचे  वैभव आहे आणि रस्ता रुंदीकरणामुळे वाऱ्यावर पडलेले अनेक गाळे धारक एस टी च्या नूतनीकरणाची वाट पहात आहेत.हातावर पोट असलेले हे कष्टकरी ते तुम्हां नेत्यांचे मतदार आहेत.जेष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगुले यांनी सांगितले की माजी खासदार संजयदादा मंडलिक व पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आम्हीं परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना भेटलो आहोत. जन संपर्क अधिकारी अभिजित भोसले यांचे ही सहकार्य लाभले. मा. परिवहन मंत्री यांनी अवघ्या दोन मिनिटात त्यास संमती देऊन सर्वेक्षणाचे आदेश ही दिले.


     गणेशा च्या आशीर्वादाने हे होऊ देत म्हणत उपस्थिती माता भगिनी व भाविकांनी गणपती बाप्पा मोरया च्या जोरदार घोषणा दिल्या.

    या वेळी स्थानक प्रमुख बाळासो परीट यांनी सर्वांचे स्वागत केले. पत्रकार राजू चव्हाण यांनी आभार मानले. सौ. चौगुले यांनी  भाविकांच्या वतीने  पूजेचे आवाहन केले. पत्रकार सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, अनिल दिवटे यांच्यासह लाल परी चे अनेक कर्मचारी उपस्थित होते.

      








         ----------------------------