मुरगूडमध्ये छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी साजरी.एकशे चार वर्षा पूर्वीच्या त्यांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे पूजन.

Kolhapur news
By -

 


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरगूड शहरात त्यांना पहिल्या नळ पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले आहे. समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या जनक बंधू सरपिराजीराव घाटगे यांच्या स्मरणार्थ सर पिराजीराव तलावाची निर्मिती केली. त्यामुळे मुरगूड शहरातील व येथील परिसरातील गावांचा पाणी प्रश्न निकाली निघाला.यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी मुरगूड येथे पिण्याच्या पाण्याचे उद्घाटन केले. या घटनेला 104 वर्षे उलटून गेली तरी या नळामधून पाणी अखंडपणे सुरू आहे. शंभर वर्षांपूर्वी सायफन पद्धतीने बिरोबा मंदिराजवळील तुकाराम चौकात पाण्याचा हौद बांधून त्या ठिकाणी पिण्याच्या चावीचे उद्घाटन केले होते. त्यावेळी शाहू महाराज स्वतः उपस्थित होते.


हा शाहू महाराज यांच्या सार्वजनिक जीवनातील शेवटच्या मोजक्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नळ पाण्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


  यावेळी बबन बारदेस्कर,  सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, गजानन साळोखे, उदय पाटील, मनोज ढोबळे, मारुती बोते, प्रदीप कोळी, प्रकाश सुतार, दिगंबर परीट, शिवाजी पाटील, अनिल अर्जुने , शिवाजी कळंद्रे, महादेव माडेकर, अनिल रणनवरे, उमेश गुरव, विनायक मेटकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



                ------------------------------