कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
पंधरा वर्षे पश्चिम बंगालची सत्ता भोगलेल्या ममता बॅनर्जी यांचा स्वतःचा आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्या हताश झाल्या असतील व पराभव स्वीकारून लगेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असे वाटले होते.
लोकशाही शासन पद्धतीत हे असंच असतं. पराभूत उमेदवार आपला पराभव नम्र पणे मान्य करतात आणि लगेच राजीनामा देतात व जनतेचा कौल स्वीकारतात. तो जनता जनार्दनाचा सन्मान असतो.
ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत उलटंच घडतंय. "मी राजीनामा देणार नाही. मी हरले नाही मला हरवलंय."
व्वा रे व्वा. काय राजनीती आहे
!
लोकशाही राज्य पद्धतीतला हा एक नवा विक्रमच म्हणावा लागेल.
ममता यांची मानसिक स्थिती बिघडली असणार हे नक्कीच. पराभवानंतर ती तशी अनेकांची बिघडते. पण त्यासाठी निवडणूक आयोगाला दोष देणे, ए टी एम मतदान पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे, मी हारले नाही, मला हरवलंय, मी राजीनामा देणार नाही अशी विधाने करणे हे भलतंच झालं.
निवडणूक आयोगाने पाच राज्यात निवडूका घेतल्या. त्यात पश्चिम बंगाल व आसाम मध्ये विक्रमी विजय मिळाला. खरं तर तो तिथल्या जनतेचा विजय आहे. तामिळनाडूत टीव्हीके , केरळमध्ये काँग्रेस प्रणित आघाडी,पोंडेचरी मध्ये सुद्धा विरोधी आघाडी विजयी झाली आहे. तेथे सुद्धा तीच ई व्ही एम मतदान पद्धती होती.
ममतांच्या पराभवाचे मुख्य कारण त्यांचा मनमानी कारभार. त्याला त्यांनी माँ, मानुष्य, माँटी असे गोंडस बंगाली नाव दिले होते.
त्यांच्या सिंडीकेट राज्य पद्धतीने त्याच्या चींधड्या उडवल्या.
ज्या मुलीवर भर रस्त्यात अत्याचार झाला, केसांना धरून फरफटत नेलं, तिची हत्या केली तीला तर न्याय मिळालाच नाही, पण गुन्हेगार मोकाट फिरत राहिले. याला सरकार म्हणायचे ? हे तर जंगल राज्य. जनतेने ते ओळखळे होते. त्या मुलीच्या आईला जनतेने निवडून देऊन आमदार केले. आई धाय मोकलून रडली. तिच्या अश्रूनी च मतदारांचे आभार मानले.
अशी अनेक उदाहरणे बंगाल च्या जनतेने पाहिली. सोशल मीडियावर आलेल्या एका मतदाराच्या बोलक्या प्रतिक्रियेत सर्व कांही समावले आहे.बंगाली भाषेतील
त्या प्रतिक्रियेचा मराठीत अर्थ असा आहे.
"ममता बॅनर्जी आणखी पाच वर्षे सत्तेवर राहिल्या असत्या तर भारतात आणखी एक बांगला देश निर्माण झाला असता. "
यात सर्व कांही आले. ममतानी नैतिकतेचे वेड पांघरू नये. जनतेचा कौल स्वीकारावा आणि तिचा सन्मान राखावा.पुन्हा जोमाने तयारी करावी, विश्वास संपादन करावा. संजय राऊत, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या सारखी पोरकट विधाने आपल्या सारख्या लढाऊ आणि मुरब्बी राजकारणी स्त्री ला शोभत नाहीत. महा विकास आघाडी कडे जोगवा मागू नका.ती पेन्शनीत गेली आहे.सुभाष चंद्र बोस यांच्या प्रमाणे स्वतःची राष्ट्रप्रेमी सेना तयार करा. एक काळ असा होता. भाजपचे केसावर फुगे येत नाहीत असे कुचेष्टे ने विरोधक म्हणायचे. तेच केस सद्या गल्ली गल्लीत पाच हजार रुपये किलोने विकले जातात. जरा विचार करा. भाषा बदला. जनते सोबत रहा.
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
-----------------------

