तीन मुलांची आई झाली बारावी उत्तीर्ण : जिद्दीसमोर अडथळे ठरले अपुरे : लग्नानंतर १७ व्या वर्षी बारावी उत्तीर्ण

Kolhapur news
By -

 

                  


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात  कोल्हापुरातील राजारामपुरी येथील एका विवाहित महिलेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तीन मुलांची आई असलेल्या या महिलेने संसाराची जबाबदारी सांभाळत बारावीची परीक्षा दिली आणि ४० टक्के गुण मिळवत यश संपादन केले . नम्रता दिलीप जाधव असे तिचे नाव आहे. लग्नाच्या  १७ व्या वर्षानंतर  नम्रता ने हे यश संपादन केले आहे. 


    

नम्रता ने घरकाम, मुलांचा सांभाळ आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षणाची ओढ कायम ठेवत हे यश मिळवले आहे. नम्रताची जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



शिक्षणासाठी वय किंवा परिस्थिती अडथळा नसतो, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. नम्रताच्या या यशामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे.नम्रताला आई पौर्णिमा ,दिलीप जाधव , पती मायकल पाटील  यांचे प्रोत्साहन लाभले. 


      नम्रताचा 'आम्ही कोल्हापुरी फौंडेशन'च्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी श्रद्धा धोंगडे, आराध्या धोंगडे, सौ.माधवी धोंगडे, कल्पना धोंगडे,भारत धोंगडे , मायकल पाटील इ. उपस्थित होते. 


        --------------------------