चार मे ला पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पालट होणार

Kolhapur news
By -

 


               

            कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


 4 मे ला पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पालट  होणार. हे कांही भविष्य कथन नाही किंवा एखादा एक्झिट पोल सुद्धा नाही.हा जनमताने दिलेला कौल असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे . 90% पेक्षा जास्त मतदान झाले आहे याचा अर्थ नवीन सरकार आणण्यासाठी तेथील जनता अत्यंत उत्सुक आहे. या परिवर्तनाचे मुख्य कारण कोणते? घुसखोर बांगलादेशीय मतदारांच्या जोरावर ममता बॅनर्जी यांनी टिकवुन ठेवलेली सत्ता. या घुसखोरांच्या मार्फतच तेथील महिलां वर भर रस्त्यावर झाले हे अत्याचार .  आणि ममता सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष होय.



   पश्चिम बंगालचा दुसरा एक बांगलादेश निर्माण करण्याची  ममता बाईंची सत्तेची भूक जनतेने ओळखली. ज्या बंगालने राम कृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर,बँकिंग चंद्र चटर्जी, यासारख्या थोर विभूतींना जन्म दिला तो बंगाल प्रांत राष्ट्रप्रेमाने पेटून उठला आहे.या पार्श्वभूमीवर बंगालच्या जनतेने मोदी आणि योगी यांना अगदी जवळून प्रथमच पाहिले. राष्ट्र निर्मितीची त्यांची संकल्पना,बंगाल च्या सर्वंकष विकासाचे स्वप्न या जोडीने जनतेला समजावून सांगितले. राहुल गांधी यांनी पण बंगाल मध्ये सभा घेतल्या पण त्या प्रभाव शून्य ठरल्या. जनता योगीं, मोदींचे सरकार आणणार असे वाटते



  गांजलेली मूळ रहिवाशी हिंदू मुस्लिम जनता ममता सरकारला वैतागली आहे.भारत बंगला देश सीमेवर  सीमा सुरक्षा रक्षक दलाच्या गद्दार अधिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे. लाच घेऊन लाखो बांगला देशी त्यांनी भारतात घुसवले होते.  हे रावण राज्य केंव्हा तरी संपवायलाच हवे असा निर्धार करून तेथील लोकांनी जय श्रीराम घोषणा दिल्या आहेत. ममताच्या धमक्या आणि मोदींची योगींची विनम्रता यापैकी एकाची निवड जनतेला करायची होती. बंगालच्या जनतेने मतदानातून क्रांती करायचे ठरवले आहे.त्यामुळे चार मे रोजी बंगालमध्ये सत्ता पालट होणार हे निश्चित असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.


              -------------------------