शिक्षकांनी गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत -शिक्षण सभापती शितल यादव : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत पन्हाळा येथे शिक्षण आढावा बैठकीत आवाहन

Kolhapur news
By -

 


            




          कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

        

 शिक्षण व अर्थ समिती सभापती  शितल यादव  यांनी सर्व शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी व पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले. तसेच पुढे बोलताना त्यांनी सर्व जि.प. सदस्य व पंचायत समिती पदाधिकारी यांना असे आवाहन केले की, ज्या शाळेत शिक्षकांची कमतरता असेल तेथे जि.प. सदस्य यांनी वैयक्तीक रित्या मानधन देऊन शिक्षकांची नियुक्ती करावी. या आवाहनाला माजी सभापती जि. प. सदस्य अमरसिंह पाटील ,  पूजा पाटील जिल्हा परिषद सदस्या,  शोभा युवराज बेलेकर जिल्हा परिषद सदस्या यांनी तात्काळ प्रतिसाद देत आपल्या कार्यक्षेत्रात असे शिक्षक नियुक्त करण्याचे जबाबदारी स्विकारली. अशा पध्दतीने पूर्ण जिल्हयात मानधनावर शिक्षक नियुक्त व्हावेत अशी अपेक्षा शिक्षण सभापती शितल प्रवीण यादव सभापती  यांनी व्यक्त केली.


दि. 28 एप्रिल  रोजी  शितल प्रवीण यादव सभापती शिक्षण व अर्थ समिती यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आढावा व मान्सून पूर्व आढावा सभा जि.प. कन्या, कुमार विद्या मंदिर पोर्ले (ता. पन्हाळा ) या ठिकाणी संपन्न झाली.


   या बैठकीसाठी  प्रवीण यादव माजी सभापती शिक्षण व अर्थ समिती, जि. प. कोल्हापूर, सभापती  राजेद् पाटील पंचायत समिती पन्हाळा, अमरसिंह पाटील जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती सभापती शिक्षण व अर्थ समिती, जि. प. कोल्हापूर,  पूजा पाटील जिल्हा परिषद सदस्या,  शोभा युवराज बेलेकर जिल्हा परिषद सदस्या  डॉ. मीना शेंडकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर,  शशिकांत पी. बडे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. कोल्हापूर , आर.व्ही. कांबळे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. कोल्हापूर,  शिवाजी मानकर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पन्हाळा आदी मान्यवर उपस्थित होते.


      या प्रसंगी अंकुर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त शिक्षक यांचा तसेच पदोन्नती बहल गट शिक्षणाधिकारी  शिवाजी मानकर यांचा सत्कार करण्यात आला.


   या वेळी बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी  डॉ. मीना शेंडकर यांनी सर्व शाळांचा मान्सून पूर्व आढावा घेतला तसेच शाळा पूर्व आढावा घेताना जि. प. शाळामधील 100% पटनोंदणी,धोकादायक इमारती निर्लेखन आढावा,मिशन अंकुरनुसार 60% पेक्षा कमी गुणवत्ता असणा-या शाळांचा आढावा, शाळा प्रवेशात्सव,मोफत पाठयपुस्तक वाटप, मोफत गणवेश वाटप,प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना,एनजीओ / सीएसआर मदतीबाबत सुचना,शालेय स्तरावरील समिती रचना व नोंदणी आढावा,डॉ. जयंत नारळीकर गणित, विज्ञान अध्ययन समृध्दी कार्यक्रम 2026 नोंदणी, इकोक्लब नोंदणी इत्यादी विषयांचा आढावा घेतला व येत्या शैक्षणिक वर्षासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या.



या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पन्हाळयाचे शिवाजी मानकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या नाईकवाडी यांनी केले.

 


पोर्ले (ता. पन्हाळा ) या ठिकाणी शिक्षण व अर्थ समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा सत्कार करतांना गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर शेजारी शिक्षणाधिकारी 
डॉ. मिना शेंडकर व अन्य मान्यवर.


           -------------------