कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अंगारकी संकष्टी म्हणजे गणेश भक्तांसाठी पुण्याईचा दिवस. या दिवशी जागरूक गणेशाचे दर्शन व्हावे अशी त्यांची इच्छा असते. एस टी च्या गारगोटी आगाराने मंगळवार दिनांक 5 मे रोजी अंगारकी संकष्टी निमित्त गणपती पुळे येथे जाण्या साठी बस ची व्यवस्था केली आहे.जेष्ठ नागरिक व महिलां साठी 50 %सवलत असेल . ₹213
ग्रुप बुकिंग ची सुद्धा सोय असून त्यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागेल. गारगोटी बस स्थानका वरून सकाळी 6 वाजता बस सुटेल व रात्री 10.45ला गारगोटीला पोचेल.
तिकीट दर याप्रमाणे
पूर्ण ₹423 ,हाफ ₹213 (एकेरी प्रवास ).
गणेश भक्तांनी लाल परी च्या या सेवेचा लाभ घ्यावा असे गारगोटी आगार प्रमुख अनिकेत चौगुले यांनी कळविले आहे.
**********************

