कोल्हापूर न्यूज / वि रा भोसले
ना जॅकेट, ना कोट, ना पुढारी टाईप पोशाख. नेहमीचाच सदरा,पॅन्ट आणि डोक्यावर कोल्हापुरी फेटा.पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्रा दिनाच्या जिल्हा कार्यक्रमाला याच साधे पणाने शोभा आणली.
आजकाल पंचायत समितीचे सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नामदार झाल्यासारखे वावरतात. मतदानापूर्वी गल्ली गल्लीत हात जोडून फिरणारे हे पुढारी निवडून आल्यावर व्हाईट कॉलर स्टाईल मध्ये समारंभातून वावरत असतात. 'कामाचं नंतर बघू' असा त्यांचा रुबाब असतो.
कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दोन्ही मंत्री अगदी साधेपणाने वागतात. ना. प्रकाश आबिटकर हे पालक मंत्री आहेत तसेच राज्याचे आरोग्य खाते सुद्धा सांभाळतात. त्यांच्यातला 'पालक' नेहमी जागृत असतो.त्यात पितृत्वाची छाप जाणवते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका,छ.प्रमिलाराजे हॉस्पिटल अशा कोणत्याही ठिकाणच्या मिटींग किंवा कार्यक्रमात याच साधेपणाने वावरतात. साध्या शब्दांत कामाच्या पद्धती बद्धल समजावून सांगतात. त्यात हयगय वाटली तर मात्र त्यांच्यातील हेड मास्टर जागा होतो.तो ही तसाच साधा असताे.
गेली तीस वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ना. हसन मुश्रीफ हे सुद्धा असेच साधेपणाने वागतात. पांढरा हाफ शर्ट आणि काळी पॅन्ट हा त्यांचा नेहमीचा पोशाख. ना जॅकेट, ना कोट.समारंभात कधीतरी ते कोल्हापुरी फेटा मात्र डौलाने मिरवतात. त्यांच्या धीप्पाड शरीरयष्टीला तो शोभून दिसतो.त्यांची कामाची पद्धत सुद्धा अशीचअसते. साधेपणात सामर्थ्य असतं हे महात्मा गांधी नी दाखवून दिलं आहे.
"उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया "
असं एका कवीने त्यांच्या साधेपणाचे वर्णन केले आहे. आपल्या मंत्र्यांची त्याच्याशी तुलना केलेली नाही हे मुद्दाम नमूद. करावेसे वाटते. नाहीतर कांही विद्वान लगेच टिकेला सरसावतील.
विन्स्टन चचिंल हे मोठे पत्रकार होते. अगदी साधी रहाणी. डोक्यावर इंग्रजी टोपी. दुसऱ्या महायद्धात त्यांनी इंग्लंड चे नेतृत्व केले. इंग्लंड जिंकायचेच म्हणून हिटलर ने जबरदस्त फिल्डिंग लावले होते. तेंव्हा चर्चिल म्हणाले."इंग्लंड जिकंले तरी आम्हीं दुसऱ्याच्या भूमीवरून लढू पण हार मानणार नाही."ही विजुगेषी वृत्ती फक्त साधेपणातून येते. त्यासाठी जॅकेट लागत नाही, कोट नाही, कोटावर फूल लागत नाही.कामा बद्दलचा प्रामाणिकपणा आणि निर्धार हाच काय तो रुबाब असतो.
ना. प्रकाश आबिटकर आणि ना. हसन मुश्रीफ यांनी साधेपणात सुद्धा एक रुबाब निर्माण केला आहे.
---------------------------------

