कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज आणि चंदगड एसटी डेपो च्या गाड्या निपाणीला थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे .दोन ते तीन तास गाडीसाठी ताटकळत प्रवाशांना गडहिंग्लज आणि चंदगड गाड्यांची वाट पहावी लागत असल्यामुळे प्रवाशांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
कोल्हापूर चंदगड आणि बेळगाव मार्गावर मध्यवर्ती असे निपाणी असल्यामुळे कामानिमित्त अनेक लोक निपाणीला येत असतात त्यांच्यासाठी गडहिंग्लज आणि चंदगड ला जाण्यासाठी गडहिंग्लज आणि चंदगड आगाराच्या एसटी बसेस निपाणीला थांबणे गरजेचे आहे. या गाड्या निपाणी बस स्थानकावर न येता बाहेर सरळ हायवेवरूनच गडहिंग्लज आणि चंदगडला जातात क्वचित एका दुसरी गाडी निपाणी बस स्थानकावर येत असते त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या होणाऱ्या या गैरसोयीची दखल गडहिंग्लज आणि चंदगड आगारांनी घेऊन त्यांच्या एसटी बसेस निपाणी बस स्थानकावर थांबवण्याची व्यवस्था करावी अशी प्रवाशांच्या मधून मागणी होत आहे.
-------------------------

