कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाने गरिब आणि गरजूंसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन फक्त दहा रूपयात सुरू केले. मात्र आता व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्याने काही शिवभोजन चालकांनी चुलीवरचे शिवभोजन सुरू केले आहे.
शिवभोजन पुरेसं आणि चविष्ट असते. शिवभोजन फक्त दहा रूपयात मिळते. वास्तविक आता दहा रूपयात चहा देखील मिळत नाही. मात्र पुरेसं जेवण फक्त दहा रूपयात हे कसं शक्य आहे, यासाठी शासन शिवभोजन चालकांना अनुदान देत.
काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली. मग जेवण बनवायचे कसं परत व्यावसायिक सिलेंडरचे दर एकदम हजार रूपयेनी वाढले. सध्या व्यवसायिक सिलेंडरची १९ किलोची टाकी ३ हजार रूपयांस मिळते. इतका दर वाढूनही महिन्याला फक्त तीनच सिलेंडर मिळतात. तसेच शासनाकडून अनुदान वेळच्या वेळी मिळत नाही. यामुळे शिवभोजन चालकांची ओढाताण होते.
यातून काही शिवभोजन चालकांनी यावर नामी उपाय काढला आहे. शिवभोजन चुलीवरच बनवायचं . ही चुलही अशी की पंख्यांचे वारं आणि लाकडाचा वापर यांचा सुरेख संगम. या चुलीला गॅस शेगडी सारखी शेगडी. बर्नरच्या ठिकाणी लाकडाचे तोंड ठेवण्याची जागा. लाकड आत घालण्यासाठी चुलीच्या डाव्या बाजूला सोय केली आहे. धूर न होता हवा लागून लाकडांचे एक सारखं ज्वलन होण्यासाठी चुलीच्या तोंडाजवळ इलेक्ट्रिक पंखा बसविला आहे. लोहारकाम करताना ज्योत एकसारखी व गतीने पेटत राहण्यासाठी भात्याचा वापर जसा केला जातो तसेच ही चूल पेटती ठेवण्यासाठी व गती कमी जास्त करण्यासाठी पंख्याचा नेमकेपणाने वापर केला आहे. यामुळे या चुलीवर चपात्या चांगल्या भाजतातही आणि लवकरही होतात. शिवाय पंख्याच्या वाऱ्यामुळे चुलीला गती मिळते, जेवण लवकर होते आणि लाकडंही कमी लागतात. म्हणूनच ही चूल शिवभोजन चालक, हाॅटेल व्यावसायिक, खानावळ चालक यांना वरदानच ठरत आहे.
कोल्हापूर येथील शिवभोजन चालक महेश पाटील सांगतात,' ही चूल सर्व बाजूंनी परवडते. लाकडांचा खर्च कमी येतो. लाकडं सहजासहजी मिळतात. जेवन रूचकर आणि लवकर होते.'
भारतभूषण केशव गिरी.
*****************


