कोल्हापूर न्यूज नेटवर्क
उतुंगतेज फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक स्पर्धेत येथील मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील आराध्या प्रदीप सौरप हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून तिची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला इस्त्रो आणि आयआयटी केंद्रांना भेटी देऊन तेथील कामकाज पाहण्याची मोफत सुविधा मिळणार आहे.
त्याचबरोबर पृथ्वीराज रणजीत कापसे याची विक्रम साराभाई शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून त्याला दरवर्षी दोन असे पाच वर्षासाठी दहा हजार स्कॉलरशिप मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई ,अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ .मंजिरी मोरे देसाई, युवानेते दौलतराव देसाई ,प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे ,कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस .पी .पाटील पर्यवेक्षक एस. डी .साठे उपप्राचार्य व्ही.जी. घोरपडे यांचे प्रोत्साहन व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
-----------------------

