कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अन्यायी संचमान्यते विरूध्द शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ तीव्र आंदोलन करणार- आम. जयंत आसगांवकर

Kolhapur news
By -

 

            


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


 महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांनी लादलेल्या संचमान्यता निकषांमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अनेक पदे अतिरिक्त ठरणार आहेत, शारीरिक शिक्षण व पर्यावरण विषयांचा कार्यभार वाटून दिल्याने अनेक पूर्णवेळ व अर्धवेळ शिक्षकांची पदे कमी होणार आहेत, प्रॅक्टिकलची बॅच ३० विद्यार्थ्यांची केल्याने पदे कमी होतील, अनेक सी. एच. बी. शिक्षकांचा कार्यभार शून्य होणार आहे तसेच महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या तासिका ४० मिनिटांच्या केल्याने सुध्दा शिक्षकांचेवर अनिष्ठ परिणाम होणार आहेत तसेच दोन विषयांचा कार्यभार एकत्र धरलेला नाही त्याचे सुध्दा अनिष्ठ परिणाम होणार आहेत, या अन्यायकारक संचमान्यतेविरूध्द कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ तीव्र आंदोलन करणार आहेत, अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या आज झालेल्या सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.


   मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथील झालेल्या सभेत प्रा. बी. एस. पाटील, प्रा. एस. व्ही. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्रा. रत्नाकर माळी, भैय्या माने, प्रा. दिलीप शितोळे, प्रा. सी.एम. गायकवाड, आर. वाय. पाटील, आदिंनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्ष एस. डी. लाड यांनी सर्वांना आवाहन केले की कनिष्ठ महाविद्यालांनी अन्यायी संचमान्यता स्वीकारू नये. सदर संचमान्यता धोरणाविरूध्द विधानमंडळात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे आ. जयंत आसगांवकर यानी सभेत जाहीर केले.


    या सभेस दादासाहेब लाड, बी.जी. बोराडे, बाबा पाटील, उदय पाटील, सुधाकर निर्मळे,एन. आर. भोसले, आर.डी. पाटील, बसवराज वस्त्रद, प्रा. आण्णासाहेब बागडी, प्रा. अभिजात दुर्गी, जगदीश शिर्के, डॉ. उर्मिला सूर्यवंशी, माधवी माळी, डॉ. स्मिता वणिरे, अजित रणदिवे, प्रा. एस. व्ही. गुरबे व प्रा. आर. पी. पाटील (चंदगड) आदी उपस्थित होते.


     


शिक्षक आमदार जयंत आसगावकर  कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या  झालेल्या सभेत बोलतांना शेजारी अन्य मान्यवर.


         -----------------