कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आयुष्यात चांगले करिअर करायचे असेल तर कठोर परिश्रमास पर्याय नाही असे उद्गार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी मुरगूड येथील विद्यार्थी गौरव समारंभात काढले.अध्यक्ष स्थानी उद्योजक सत्यजित पाटील होते.
विविध शाळांतून उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुण गौरव नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.ते म्हणाले की आयुष्यात आपण काय बनायचे आहे ते विदयार्थ्यांनी प्रथम निश्चित करावे. त्या नुसार नियोजन करून ध्येया प्रत पोचण्यासाठी कठोर परिश्रम करावेत. मग यश तुमचेच आहे.
यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.शहरातील जमादार चौकाच्या नाम बदलाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले मुरगूड मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि दुर्गामाता उत्सव बाळू जमादार यांनीच सुरू केले. ती परंपरा आजही आम्ही चालू ठेवली आहे.नगर पालिकेवर भगवा फडकवण्याचे काम माझ्याच कारकिर्दीतील आहे. नगर परिषदेसमोरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीत माझे योगदान मोठे आहे. शिवतीर्थ ही कल्पनासुद्धा माझीच आहे. आज आम्ही सत्तेवर नाही.वेळ प्रत्येकाची येत असते.अंबाबाई मंदिरासाठी निधी आणण्यात सुद्धा मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.असे असताना विरोधकांनी घाणेरडे राजकारण करू नये.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले,पं. स. उपाध्यक्ष इंद्रजित पाटील, विकास पाटील, बिद्रीचे संचालक रंगराव पाटील, पंचायत समिती सदस्य रूपाली आंगज, नगरसेवक राजू आमते,राजे बँकेचे संचालक अमर चौगुले, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी,कोजिमाशी चे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुनील चौगुले, राजू भारमल,यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम शहर राष्ट्रवादी काँग्रेस व बाळासो जमादार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
------------------------




