कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सध्या सुरु असलेल्या जनगणनेत बोरबेट गावचे प्रगणक नितीन गोरे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करमणूक तहसीलदार पाटील, गगनबावडा तहसीलदार रुपाली बरगे, गटसुपरवायझर प्रदीप कदम आदी उपस्थित होते.
गावापासून ६ ते ७ किलोमीटर जंगल भागात असणारे पदमसत्ती, मोरजाई पठार ज्या ठिकाणी चालत जावे लागते. जंगली प्राण्यांचा वावर असतांना देखील राष्ट्रीय कर्तव्य बजावताना स्वतः च्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन गोरे यांनी कामकाज पूर्ण केले. जनगणना कामात आनंद शोधून हसत हसत दोन दिवसांत काम पूर्ण करणारा तरुण गगनबावडा वासियांनी पाहिला. याचे फलित म्हणून आज अध्यापक नितीन गोरे यांचा सन्मान करण्यात आला . पदमसत्ती व मोरजाई अशा दुर्गम आणि डोंगराळ भागात जनगणना शेवटच्या घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम गगनबावडा तालुक्याने केले आहे. असे गौरउद्गार काढत जिल्हाधिकाऱ्यांनी गगनबावडा तालुक्याचे कौतुक केले.
नितीन गोरे यांना तहसीलदार रुपाली सूर्यवंशी ,गटशिक्षणाधिकारी सौ . वसुंधरा कदम ,शिक्षण विस्ताराधिकारी रघुनाथ कुंभार,केंद्रप्रमुख विश्वनाथ चौगले,यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.
जनगणनेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल अध्यापक नितीन गोरे यांचा जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .


