टीईटी परीक्षेचा पेपर फुटला : उद्या रविवारची परीक्षा रद्द

Kolhapur news
By -

 

              


 पुणे : उद्या रविवार, २८ जून  रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर   ठाण्यातील भिवंडी येथून  फुटला असून तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे अद्याप कळू शकलेलं नाही. यापूर्वी देखील ही परीक्षा झाली होती , तेव्हा त्याच्या तपासणीमध्ये मोठा घोटाळा झाला होता. अनेकांना अवाजवी पद्धतीनं कितीही मार्क्स वाढवून देण्यात आले होते. त्यामुळं या परीक्षेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला असतानाच आता बऱ्याच काळानंतर होत असलेल्या याच परीक्षेचा पेपर फुटल्यानं शिक्षक आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.



पोलिसांना आपल्या खबऱ्यांकडून या पेपरफुटीची माहिती मिळाली होती की, टीईटीच्या परीक्षेचा पेपरची सध्या विक्री सुरु आहे. अनेकांकडून या पेपरसाठी पैसे दिले जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हा फुटलेला पेपरही मिळवला आहे. त्यानुसार, पुढे शिक्षण विभागाकडून ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आता अधिकृत पत्रकार परिषद घेऊन विभागाकडून याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.



त्यामुळं ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे.  देशात NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. टीईटीच्या परीक्षेला यंदा 6 लाखाहून जास्त   परीक्षार्थी बसले होते.

                 


 शासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध 


TET चा पेपर पुटणे हा शासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा असून सव्वा सहा लाख शिक्षक - विद्यार्थ्यांचे भवितव्य उधवस्त करणारा आहे .
सुप्रीम कोर्टाने TET करणे सक्तीचे केलेने परीक्षार्थीनी या परीक्षेची केलेली तयारी वाया गेली आहे .आता सुप्रीम कोर्ट शासनावर काय कारवाई करणार हे त्यांनी स्पष्ट करावे .
केवळ परीक्ष देणेची संधी वाढवून कांही होणार नाही या परीक्षेला बसलेल्या सर्व परीक्षार्थीना उतीर्ण झालेचे प्रमाणपत्र देऊन या  परीक्षार्थीना न्याय द्यावा .

     - भरत बा.रसाळे (राज्याध्यक्ष )
महाराष्ट्र राज्य खा प्राथ शिक्षक सेवक समिती 

                 -------------


प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचे TET परीक्षा रद्द झाले बाबतचे निवेदन



      

                   ---------------------