मोदींच्या मेलोडीने देशाला काय दिले? ही तर जगाला मंत्रमुग्ध करणारी राजनीती आहे.

Kolhapur news
By -

 

            


          कोल्हापूर न्यूज /  वि.रा.भोसले


अजित : कायरे अशोक, मोबाईल काय बघत बसला आहेस. ट्रेन येईल एवढ्यात. तयार रहा.

अशोक : मित्रा हे बघ जरा. काय मस्त व्हिडीओ आहे. गाणं सुद्धा काय भारी टाकलंय.

"तेरे चांदी जैसे गाल 

  सोने जैसे बाल 

 तूही एक धनवान 

  बाकी सब कंगाल."

अजित : अशोकच्या मोबाईल मध्ये डोकावत.

   अरे हा व्हिडीओ होय. मोदी आणि मॅलोनी यांचा हा व्हिडीओ जगभर पोचलाय.मी सुद्धा दहा वेळा पाहिलाय.

अशोक :"काय जोडी आहे नाही. आम्हांला असं कोणी मिळतच. नाही."

अजित : "लेका, तू ज्या दृष्टिकोनातून हा व्हिडीओ पहातोस तसं कांहीही नाही. याला मेलोडी राजनीती म्हणतात. (Melody Diplomacy).ट्रेन आलीय. चल आत बसून बोलू. तुला मोदीं मेलोनी यांची ही राजनीती सांगतो.दोघे ट्रेन मध्ये स्थानापन्न झाले. अजित बोलू लागला, अशोक ऐकू लागला.


    मध्यपूर्वेत इंडिया मिडल इस्ट इकॉनॉमिक कॉरिडोर  स्थापन झाला आहे. त्याला IMEC असे संक्षिप्त नाव आहे. मोदी आणि मेलोनी यांचा त्यात पुढाकार आहे.


भारत देश तंत्रज्ञानात अत्यंत वेगाने वाढत आहे. त्याचे श्रेय  IMEC ला जाते. इटली आणि भारत यांच्यात परस्पर व्यापार तर वाढणारच पण इटली कडून आपल्याला संरक्षण विषयक तंत्रज्ञान सुद्धा मिळणार आहे. इस्रायल पाठोपाठ इटली आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे.


     मेलोनी सुद्धा संघर्षातून पी एम पदा पर्यंत पोचल्या आहेत.मध्य पूर्वेतील इतर नेते सुद्धा जॉर्जीया मॅलोनी ना भेटतात. युरोपीय संस्कृती व परंपरे नुसार त्या इतर नेत्यांना अलिंगन देतात.त्या त्या नेत्यांना मानवंदना सुद्धा दिली जाते.मोदींच्या बरोबरची त्यांची केमिस्ट्री मात्र वेगळी आहे. त्यांच्याशी त्या हस्तांदोलन करतात. दिलखुलास हसतात. रोमच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाची माहिती देतात. पंतप्रधान मोदी तन्मयतेंने ऐकतात. दोघांनाही आपल्या देशाचे गत वैभव पुन्हा प्राप्त करावयाचे आहे असे त्यांच्या चर्चेतून दिसून येते. मॅलोनी यांचा मध्यपूर्वीतील प्रभाव अत्यंत वेगाने वाढत आहे. जर्मनी आणि इटली हे देश गेल्या महायुद्धात  दोस्त होते. सध्या ते कोणत्याही युद्धात गुंतलेले नाहीत. इराण,अमेरिका इस्रायल,इंग्लंड,युक्रेन, रशिया, लॅबेनांन, पाकिस्तान, यू ए ई, कतार या देशांना युद्धाचे जोरदार हादरे बसत आहेत. इटली मात्र तटस्थ आहे आणि शांतताप्रिय भारताशी मैत्रीचे घट्ट बंध निर्माण करत आहे.


 मोदींच्या बरोबर  कार ने प्रवास करतानाचा व्हिडीओ पण खुप व्हायरल झाला आहे. तसा तो मुद्दाम केलाही आहे. इटली आणि भारत यांच्यातील दृढ मैत्रीचे ते संकेत आहेत.


    मोदींनी त्यांना मेलोडी  भेट दिली आहे. मेलोनी आणि मोदी किंवा इटली आणि इंडिया यांच्या दृढ मैत्रीचे ते प्रतिक आहे.


  सोशल मीडिया वरील रील वाले रोमँटिक रील बनवून पैसे मिळवत आहेत हा भाग वेगळा. त्या बिचाऱ्यांना मेलोडी डिप्लोमसी चा अर्थ कळायला खुप वेळ लागेल.


  जगात युद्धाचे वादळी वारे सुरु झाले असले तरी इटली,इंडिया जपान शांत आहेत.त्यांनी एकमेकांच्या हातात हात देत विकासाचे रिंगण तयार केले आहे.


  पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ हे शेजारचे देश भुके कंगाल झाले आहेत. वाढत्या लोकसंख्ये मुळे आपल्याकडे बेरोजगारीची समस्या असली तरी त्यांच्या सारखा  कटोरा हाती घेतलेला नाही. इटली, जपान च्या मैत्री मुळे आपल्याला फक्त बुलेट ट्रेन मिळणार नाही तर सेमिकंडक्टर चे प्रगत तंत्रज्ञान सुद्धा मिळणार आहे. मोठाल्या उद्योगाबरोबर मोबाईल निर्मिती सुद्धा या देशात प्रचंड वेगाने होत आहे.


  येत्या दोन वर्षात जी डी पी (Gross Domestic Product )ची वाढ वेगाने होत राहील.याला सोप्या भाषेत आत्मनिर्भर भारत म्हणता येईल.

   हे ऐकून अशोक चक्रावून गेला.

आणि म्हणाला 


"मेलोडी म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर जगाला मंत्रमुग्ध करणारी मोदी मेलोनी ची राजनीती आहे."


             ---------------------