श्रीकृष्णाच्या गोकुळ मध्ये सुरु आहे महाभारत.

Kolhapur news
By -

 


        

          कोल्हापूर न्यूज  / वि.रा .भोसले  


कुरुक्षेत्रवार 14 दिवसांचे महाभारत युद्ध झाल्याचे सर्वांना माहिती आहे. युद्ध काळात त्यावेळी अनेक घोषणा, प्रतिज्ञा झाल्याचे सुद्धा ज्ञात असेल.गोकुळ मध्ये असेच महाभारत सुरु आहे.यातील साधर्म्या बाबत दूध उत्पादक च तर्क मांडतील कारण तेच खरे गोकुळ चे मालक आहेत.


 सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

  मी हाती शश्त्र धरणार नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करेन...... श्रीकृष्ण.

    गोकुळ ची निवडणूक युती आणि आघाडी अशीच होईल. शासन त्यात हस्तक्षेप करणार नाही.... देवेंद्र फडणवीस.


   माते युद्धात  फक्त अर्जुन हेच माझे लक्ष्य असेल. आम्हां दोघांपैकी एक मारला गेला तरी पाच पांडव शिल्लक राहतील....... कर्ण


   जय पराजय याचा विचार करणार नाही. कोणीही जिंकलं तरी आमची मैत्रि अबाधित राहील..... सतेज पाटील.


     हे मधू सुदना मी तुला शस्त्र हाती धरायला लावीन.उद्या पृथ्वी पांडव मुक्त करेन ... भीष्म.


    गोकुळ ची निवडणूक युती ला एवढी सोपी नाही. त्यांना झुंजायला लाऊ...... काँग्रेस आघाडी.

 गोकुळ मुश्रीफ मुक्त करायचे आहे..... आमदार शिवाजी पाटील.

सूर्यास्ता पूर्वी मी जयद्रथा चा वध करेन नाही तर अग्निप्रवेश करून प्राण त्याग करेन.... अर्जुन 


अर्जुना, हा पहा सूर्य आणि हा पहा  जयद्रथ..... श्रीकृष्ण 


मी युतीचा च आहे हे सिद्ध करायला मला आणखी काय करावे लागेल... हसन मुश्रीफ.


              -----------------