स्मार्ट प्रीपेड मिटर बसवण्यास चिखलीकरांचा विरोध

Kolhapur news
By -

            

               


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड मिटर बसविण्यास चिखलीकरांनी विरोध केला असून त्यासंबंधीचे निवेदन लिंगनूर कापशीच्या उपअभियंत्यांना दिले आहे. 


विरोधास डावलून महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेट मिटर बसवलेस जनउद्रेक भडकेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे उपकेंद्र लिंगनुर कापशी यांची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच जबरदस्तीने मीटर बसवल्यास भिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने महावितरण  कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही ही  दिला आहे. 


यावेळी सरपंच  युवराज कुंभार , विजय गस्ती ,अजित पिसाळ , प्रदिप कांबळे  उपस्थित होते. 


          ---------------------