मुरगूड मधील ग्रामीण रुग्ण्यालयास तात्काळ ५० बेडसाठी निधी द्या अन्यथा आंदोलन : नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांचा साखळी उपोषणाचा इशारा

Kolhapur news
By -

 

                 


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     मुरगूड ग्रामीन रुग्णालयास ३० बेड वरून ५० बेड ला मंजुरी मिळून दोन वर्षे होत आली तरी सुद्धा ५९ बेड रूग्णालय होण्यास निधीचा मोठा अडथळा निमार्ण झाला आहे त्यामुळे ५० बेडच्या मुरगूड ग्रामीण रुग्णालयासाठी तातडीने निधी द्यावा अन्यथा मुरगूड व परिसरातील लोक आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे मुरगूड चे नगरसेवक दत्ता मंडलिक व अन्य लोकांनी दिला आहे


निवेदनातून पुढे असे म्हटले आहे की तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सांवत  यांनी ५० बेड रुग्ण्यालयास मंजुरी दिली होती. तरी सदर रुग्णालयास निधी मिळावा यासाठी वारंवारं पत्र व्यवहार करुन तसेच प्रत्यक्षात भेटून तुम्हाला वेळीवेळी निधी लावण्याची विनंती केली आहे. तरी सदर मुरगूड ग्रामीण रुग्ण्यालयाला शासनाचा निधी लवकरा लवकर मंजुर करुन देण्यात यावा. 


त्याच प्रमाणे मुरगूड शहर व पंचक्रोशीतील सर्व लोकंना न्याय देण्यात यावा ही विनंती. कागल तालुक्यातील मुरगूड शहर अत्यंत महत्त्वाचे शहर असून त्या शहरास लागून ७० ते ८० या गावांचा ग्रामीण रुग्ण्यालयाशी थेट संपर्क येतो. त्याचप्रमाणे भुदरगड व राधानगरी तालुक्यातील पेशंट हे देखील मुरगूड ग्रामीण रुग्ण्यालया मध्ये उपचार करण्या करिता येतात. 


तसेच मुरगूड ग्रामीण रुग्णालय मध्ये उपलब्ध असण्या-या सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्याच प्रमाणे मुरगूड शहरातील नागरिकांना व आजू बाजुच्या खेडयातील लोकंना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कागल तालुक्यातील विद्यमान आमदार यांचेकडे वैद्यकीय शिक्षण हे महाराष्ट्रातील वजनदार खाते असूनही वारंवार मुरगूड मधील ग्रामीण रुग्ण्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे.


 रुग्ण्यालयामध्ये इतर विभाग असूनही लोकांना सोयी सुविधांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच रुग्णालयाध्ये आर्थोपेडिक डॉक्टर, स्त्री-रोग तज्ञ व प्रसुती वेळी लागणारे इतर सहायक, व तसेच रुग्ण्यालयामध्ये लागणाऱ्या औषधांचा तुटवडा, व सोनोग्राफी मशीन बरेच दिवस बंद अवस्थेत आहे तरी त्या मशीनसाठी डॉक्टर उपलब्ध नाही आहे.


सदर विषय गांर्भीयपूर्वक घेवुन मुरगूड ग्रामीण रुग्ण्यालयास व मुरगूड शहरास योग्य तो न्याय देणेत यावा. अन्यथा आम्ही तमाम मुरगूड वाशीय साखळी उपोषण व आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा देत आहोत 


यावेळी शशिकांत पाटील, अभिजित सुतार, अभिजित मिटके, राकेश शिंदे, दिग्‍विजय सुतार विवेक मंडलिक यांच्या सह 100 हुन नागरिकांच्या सह्या आहेत. 



       कोल्हापूरचे पालकमंत्री .प्रकाश आबिटकर यांना निवेदन देताना  नगरसेवक दत्तात्रय मंडलिक,शशिकांत पाटील आदी मान्यवर



  ----------------------------------