कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वाढीव घरफाळा रद्द करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते खात्यावर त्वरीत जमा करावेत या मागणीसाठी सर्व पक्षीय नागरिक यांच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढला.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील,उपनगराध्यक्षा श्रीम.रेखाताई मांगले, मुख्याधिका-यांना निवेदनही दिले.
बसस्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला.अन्यायी घरफाळा कमी झालाच पाहिजे.घरकुलचे हप्ते त्वरीत जमा झालेच पाहिजेत.अशा आशयाचे फलक नागरिकांनी हातात घेत तशा घोषणांही दिल्या.
निवेदनातील मजकूर असा.
२०२१ नंतर प्रशासक काळात २० टक्के तर आता पाच टक्के अशी एकुणा पंचवीस टक्के घरफाळा वाढ केली आहे. अगोदरच जादा असणारा घरफाळा त्यामध्ये जनतेला विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन हुकूमशाही पध्दतीने जनतेवर लादली आहे. हा वाढीव घरफाळा रद्द होण्याबाबत २७/०५/२०२६ रोजी निवेदन दिले होते. त्यावर अजुनही काहीच कारवाई केलेली नाही.यासदर्भात लवकरात लवकर कारवाई करून अन्याकारक असणारी घरफाळा वाढ त्वरीत रद्द करावी.तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते अदयाप जमा झालेले नाहीत. तरी नगरपालीकेमार्फत सदर लाभार्थी यांना चेक वाटपचा कार्यक्रम घेतला होता. तरीही अदयाप त्या लाभार्थी यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. तरी सदर लाभार्थी यांना खात्यावर अनुदान जमा झालेले PMAYUM कडुन मॅसेज आलेले आहेत व अनुदानही जमा झालेले नाही.अनुदानापासुन वंचीत राहीलेल्या लोकांचे अनुदानांचे हप्ते लवकरात लवकर जमा करण्यात यावेत .
माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी,मा नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर , नितीन मोरबाळे, दिगंबर परीट,संग्राम साळोखे, सुरेश गोधडे, आकाश दरेकर यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या.
मोर्चात माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस , माजी नगरसेवक विलास गुरव,फिरोजखान जमादार, विशाल सूर्यवंशी, सचिन मेंडके, प्रकाश हळदकर,शशिकांत गोधडे, समाधान बोते,अमर इंदलकर,संगीता राऊत, शोभा राऊत, सत्यजित चौगले, विशाल भोपळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------------------------

