कोल्हापुरातील सदर बाजार हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन पदी भारत धोंगडे यांची निवड

Kolhapur news
By -

 

 


                   


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क  



बुधवार  दि 1/ 7/26  रोजी सदर बाजार हाऊसिंग सोसायटी कोल्हापूर या संस्थेची मिटिंग संस्थेच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली  मा. उपनिबंधक  सहकारी संस्था कोल्हापूर शहर कोल्हापूर यांच्या कार्यालयातील अध्यासी  अधिकारी म्हणून  किरण. दा. सातदिवे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली , सदरच्या मिटिंग मध्ये नवीन चेअरमन  पदाची निवड घेण्यात आली व चेअरमन पदी म्हणून संचालकांचे मत घेऊन निवड प्रक्रिया पार पडली . सदरच्या निवड प्रक्रियेमध्ये  चेअरमन पदासाठी एकच अर्ज भारत धोंगडे यांचा आल्यामुळे बिनविरोध निवड  भारत धोंगडे यांची चेअरमन पदी निवड जाहीर करण्यात आली .



निवड प्रक्रियेनंतर  नूतन चेअरमननांचा सत्कार संस्थेचे संचालक  प्रभाकर घाटगे व निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते नूतन चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला . 



सदर मीटिंगमध्ये  मधूसुधन बंदसोडे, प्रभाकर घाटगे, दगडू कांबळे, चंपा माने, मारुती माने हे सर्व संचालक व परशराम पवार संचालक व सचिव हे सर्व उपस्थित होते व संस्थेचे सेक्रेटरी  परशराम पवार यांनी आभार व्यक्त केले. 



               ---------------------------