कनिष्ठ महाविद्यालयांचा २१ जुलै पासूनचा संचमान्यता कॅम्प स्थगित करावा : विभागीय शिक्षक संघटनेची शिक्षण उपसंचालकांच्याकडे मागणी

Kolhapur news
By -

 

           


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क    


 सोमवार दिनांक 20 जुलै  रोजी कोल्हापूर विभागीय शिक्षक संघटनेच्या वतीने 21 जुलै 2026 पासून कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आयोजित केलेला कनिष्ठ महाविद्यालयाचा संचमान्यता कॅम्प स्थगित करण्यात यावा या संदर्भात लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना शिष्टमंडळाने दिले. या विषयी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनीही शिक्षक संच मान्यता स्थगित ठेवावी अशी सूचना दूरध्वनीवरून केली.


     यावेळी ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन 2024- 25 प्रमाणे शिक्षक पदे सुरक्षित राहत असतील तर त्या कनिष्ठ महाविद्यालयाने संच मान्यता ड्राफ्ट आपल्या इच्छेनुसार अंतिम करून घ्यावा. परंतु सन2024- 2025 प्रमाणे संच  मान्यता होत नसेल तर त्यांनी संच मान्यता स्वीकारू नये. तशा सक्त सूचना शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर  व अधीक्षक,महेश सावंत यांना संघटनेने दिल्या आहेत . 


    त्यामुळे ज्यांच्या सन 2024- 25 च्या एकूण शिक्षक पदांमध्ये कोणताही बदल होत नसेल त्यांनी संचमान्यता अंतिम ड्राफ्ट आपल्या इच्छेनुसार स्वीकारावा.परंतु सन 2025- 26 च्या संचमान्यतेमध्ये आपल्या कॉलेजमधील शिक्षकांची पदे कमी होत असतील तर कोणीही संच मान्यतेचा अंतिम ड्राफ्ट  स्वीकारू नये.व त्यासाठी आपणावर उपसंचालक कार्यालयातील कोणीही सक्ती करत असल्यास त्वरित संघटना  पदाधिकाऱ्यांना कळवावे.


    तसेच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ देखील राज्य पातळीवर जुन्याच निकषाप्रमाणे संच मान्यता होण्यासाठी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक व मंत्रालय पातळीवर प्रयत्न करत आहे.यावेळी महासंघाचे सहसचिव व सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिलीप शितोळे, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष, प्रा. विजय मेटकरी,प्रा.ओमकार मालंडकर, प्रा.प्रवीण देसाई,प्रा.मल्हारी हुलगे, प्रा. प्रमोद सावंत, प्रा.भालदार यासह इतर शिक्षक उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धीस प्रा. विजय मेटकरी यांनी दिली.


 कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना लेखी निवेदन देतांना कोल्हापूर विभागीय शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ


        -----------------------