"स्वार्थापेक्षा सेवा श्रेष्ठ" मानणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व चा पदग्रहण सोहळा उत्साहात

Kolhapur news
By -

 

         




                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क



"स्वार्थापेक्षा सेवा श्रेष्ठ" मानणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व चा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला . सचिव व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि नव्या सदस्यांचा स्वागत समारंभ अतिशय उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


रोटरी ही केवळ एक संस्था नसून "Service Above Self" या मूल्याला जपणारी समाजसेवेची चळवळ आहे. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. 


    भविष्यात ही सामाजिक उपक्रम पार पाडण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. समरजितसिंह घाटगे , अरुंधती धनंजय महाडिक, नवोदिता घाटगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 



                ---------------------------