कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अध्ययनाला भक्ती आणि श्रद्धेची जोड देणारा छोटया मुलांचा अविष्कार कौतुकाचा विषय ठरला. श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होत देशभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणाऱ्या महाराष्ट्रीयन संतांची ओळख छोट्या मुलांच्या सादरीकरणातून करण्यात आली.
ज्ञानेश्वर माऊली,तुकाराम एकनाथ,नामदेव चोखामेळा कान्होपात्रा,जनाबाई, विसोबा खेचर,सावंता माळी अशा सर्व पंथातील संतांचे दर्शन बालकलाकारांनी घडविले.
संगीताची सुरेल साथ आणि बहारदार नृत्याविष्कार यामुळे या सोहळ्याला विशेष रंगत आली.येथील शिक्षक वृंदाने यासाठी विशेष परिश्रम घेतले.
--------------------------



