रक्षाबंधन निमित्त मुरगूड मध्ये संपन्न होणार लाडक्या बहिणींचा स्नेह मेळावा : ना. हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे उपस्थित राहणार

Kolhapur news
By -

 

          


                        कोल्हापूर न्यूज नेटवर्क



रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्या मधील स्नेहाच्या, प्रेमाच्या आणि विश्वासाच्या गाठी दृढ करणारा सण आहे. हा सण एक सामाजिक उत्सव म्हणून ही साजरा केला जातो. यातून महिलांचे रक्षण करणे व त्यांचा सन्मान करणे हा उद्देश असतो. सीमेवरील जवान देशाचे रक्षण करतात म्हणून देशभरातील लाखो महिला, विदयार्थी, विदयार्थीनी, सामाजिक संस्था जवानांना राख्या पाठवतात.



     रक्षाबंधनानिमित्त असाच एक लाडक्या बहिणींचा स्नेहमेळावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुप चे अध्यक्ष समरजीत सिंह घाडगे या दोघांच्या उपस्थितीत 6 सप्टेंबर मुरगूड मध्ये रोजी संपन्न होत आहे.  पै. बाळासाहेब जमादार सेवा भावी संस्थे मार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे माजी नगराध्यक्ष राजेंखान यांनी सांगितले. 



  या स्नेह मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शिल्पा खोत, जिल्हा परिषद सदस्य सौ.शिवानी भोसले ,पं. स. सदस्या सौ. दीपाली आंगज,सौ. तसनीम जमादार या मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यानंतर स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याचे संयोजक समितीकडून समजले.



             ----------------------------