कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बाप्पा आता लवकरच येतील त्यांच्या स्वागतासाठी अबाल वृद्ध सगळे सज्ज झाले आहेत. बाप्पांच्या आगमनाने आनंदाचे नंदनवन अगदी फुलून जाईल. काय आवडेल बरे गणपती बाप्पाला! बाप्पाला लाडू,मोदक तर आवडेलच पण त्याच्या स्वागतासाठी आणि उत्सवासाठी लेझीम ढोल आणि ताशा हेच त्याला अधिक आवडेल. ही पारंपारिक वाद्ये आहेत.
पोलीस प्रशासनाने सुद्धा तसेच आवाहन केले आहे. डीजेला परवानगी देण्यात येणार नाही किंबहुना त्यांच्यावर वेळीच योग्य कारवाई केली जाईल असेही सांगितले आहे. डीजेला प्रतिबंध करण्याची कारणे काय ते तुमच्याच शब्दात सांगितले की पटेल.ऐका तर.
बंडया अवघा 14 वर्षाचा. डीजे च्या तालावर नाचला, नाचला आणि सकाळी घरी आला. आई वडिलांनी कपाळावर हात मारून घेतला.पोरगं किवंडं झालं. चंदूला अशी चक्कर आली की दोन कांदे फोडून सुद्धा शुद्धीवर आला नाही.शेजारच्या कुटुंबातील सगळयांची झोपच उडाली. आईला तर निद्रानाश विकार जडला.
गर्दीतल्या 90%लोकांना भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागला. नाचणारे 10 टक्के पाच दिवस आजारी पडले. गणपती बाप्पा त्यांनी पहिलाच नाही.साठ वर्षाच्या रमा काकी आणि त्यांच्या मांडीवरचा तीन वर्षाचा नातू यांचे ह्रदयाचे ठोके एकदम वाढले. सगळी दारं बंद करूनही डी जे चा आवाज येतच राहिला. त्यांना हॉस्पिटलला न्यावे लागले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पोरा पोरीचं नुकसान झालं. त्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यात आलं.Gen Z ने अजुन तिशी सुद्धा ओलांडली नाही.
डी जे म्हणजे लोकांच्या जीवावर बेतणारे ध्वनी अस्त्र होय. अग्नी अस्त्राहून भयानक. डी जे वाल्या मालकांच्या पोटावर पाय येतो त्याचं काय.? असा प्रश्न ही कोणी तरी विचारेल. अगदी बरोबर. पुण्या मुंबईत ढोल संच जागोजागी वाजत आहेत. मुली सुद्धा मोठे ढोल वाजवतात. या संचात लेझीम असते. संगीत सुद्धा असते.डी जे साठी तेवढ्याच किमतीत ढोल संच हा सुंदर पर्याय ठरू शकेल.पुण्यात डीजे ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एका डीजे वाल्याने हल्ला केला.भावा त्याने समस्या सुटणार नाही.थोडं संयमा ने घे. तूझ्या मागे समाज सहानुभूतीने उभा राहील. शिवाय पोलिस प्रशासन तुझा सन्मान करेल.
लोकांच्या जीवाशी खेळून पैसे मिळवणे हे महापाप आहेरे भावा. बाप्प्पा तुला कधिच क्षमा नाही करणार ! गणपती बाप्पा हा सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. त्याला लेझीम, हलगी,ढोल आणि ताशा आवडेल. डीजे चा जीवघेणा तमाशा नाही.
--------------------

