.... तर शासनाने आम्हास सामूहिक इच्छा मरणाची परवानगी द्यावी

Kolhapur news
By -

 

             


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   



महाराष्ट्रातील १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित पण  २००५ नंतर १०० % अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे १९८२च्या जुन्या पेन्शन पासून वंचित राहिलेले आहेत. तसेच या कर्मचार्‍यांना जुनी किंवा नवी यापैकी सध्या कोणतीच पेन्शन मिळत नाही या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही २००५ पूर्वीचीच असल्याने न्याय तत्त्वाने याने १९८२ ची पेन्शन देय असल्याने या सर्वाना जुनी पेन्शन लागु करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन  समन्वय संघाचे वतीने  आंदोलनाचा कृती कार्यक्रम केला आहे.



   मंगळवार दिनांक १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर पर्यंत काळ्या फिती लावून शालेय कामकाज करणे, शनिवार दिनांक ५ सप्टेंबर  जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब सहभागी होऊन काळे मास्क लावून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे,याकडे शासनाने दुर्लक्ष केले तर २८ सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन, 2ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे, आम्हाला पेन्शन द्यायचीच नसेल तर शासनाने आम्हास सामूहिक इच्छा मरणाची परवानगी द्यावी, पेन्शन न दिल्यास येणार्‍या विधान परिषद शिक्षक व पदवीधर निवडणुकीवर शिक्षक  शिक्षकेतर पालक यांचे वतीने मतदानावर बहिष्कार असे आंदोलनाचा कृती कार्यक्रमाची सुरुवात  १ सप्टेंबर रोजी झाली.



   त्यानुसार राज्यातील सर्वच शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला अशी माहिती प्रसिद्धीस जुनी पेन्शन समन्वय समितीचे बाबासाहेब पाटील यांनी दिली.


             ----------------------------