कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मान्सून बाय करून निघून गेला. कुठे सांडला,कुठे नाही.दुष्काळाचे सावट मात्र महाराष्ट्रात सोडून गेला. नैसर्गिक संकटाला सुद्धा न डगमगता कसे सामोरे जायचे हे आपल्या ग्रामीण संस्कृती ने शिकवले आहे. शारदीय नवरात्रीय उत्सवात तिचा ठसा असा गल्लीत सुद्धा उमटतोय.
मुरगूड येथे डांबरी रस्त्यावर या संस्कृतीचे दर्शन घडताना दिसले. फुलांच्या आणि रंगांच्या रांगोळीने तो नटला. एवढेच नव्हे तर मुलांच्या, महिलांच्या,युवकांच्या, जेष्ठ नागरिकांच्या अभिनयातून जीवंत झाल्यासारखा वाटला.
दसरा हा राम रावण युद्धातील विजयाचा उत्सव आहे.तसा सुगी संपून शेतातले धान्य घरी आणण्याचा ही उत्सव आहे.
ग्रामदेवता आई अंबाबाईला साकडं घालण्याचा उत्सव आहे.
देवीच्या दर्शनाला पहाटे पासून भक्तांची रांग लागलेली असते. रोज एक रंग अशा नऊ रंगात महिला भगिनी नटतांना दिसत आहेत.अनेकांनी नवरात्रीय उपवास सुद्धा केले आहेत. यातून श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पहायला मिळत आहे.
दुष्काळ तोंडावर आहे.पाणी वाचवा असे संदेश सोशल मीडियावर येत आहेत. त्याचा ही सन्मान या ग्रामीण संस्कृतीत होतांना दिसतोय.
शिवरायांच्या स्फूर्ती दायक इतिहासाची आठवण देत युवकांनी आयोजित केलेल्या या उत्सवाचे सर्वत्र चांगले कौतुक व स्वागत होतांना दिसत आहे.
----------------------

