हायकोर्ट च्या कोल्हापूर खंडपीठाने सर्किट गोपीचंद पडळकर यांचा अर्ज ठरवला अवैध

Kolhapur news
By -

 

              


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    सांगली  जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहकारी बँकेच्या निवडणुकीतील जत सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आज  कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा अर्ज अवैध असल्याचा निर्णय कोल्हापूर खंडपीठाने दिला. त्यामुळे गोपीचंद पडळकरांना  निवडणुकीत  लढवता येणार नाही.  



सांगलीमधील जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडळकरांचा अर्ज वैध ठरविल्यानंतर याविरोधात माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातूनही पडळकरांना धक्का देण्यात आलाय. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने सांगली जिल्हा बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, विरोधकांनी या अर्जाला आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद ठरवला. त्यामुळे, हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. 



न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. जत सोसायटी गटातील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आज कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याप्रकरणी पडळकर यांना ज्यांनी ज्यांनी खोटे कागदपत्रे दिले त्यांच्यावरही फौजदारी दाखल करा अशी देखील मागणी माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे.



गोपीचंद पडळकर यांच्या कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीतील सभासदत्वाला आणि निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालक-पदाच्या अनुभवाला याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हा बँकेच्या उपविधीनुसार संबंधित संस्थेचे किमान दोन वर्षांचे सभासदत्व व व्यवस्थापक समितीवर एक वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. पडळकरांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली, तर त्यापूर्वी त्यांना सभासदत्व कसे मिळाले? निंबवडे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र केवळ गावापुरते असल्याने तेथील सभासदत्व आणि संचालकपद निवडणुकीच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरता येते का, हा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला होता.



              -----------------------