वेदगंगेवरील कुरणी बंधारा कचऱ्याने भरला .शिवभक्तांनी स्कुबा डायव्हिंग करून साफ केला.

Kolhapur news
By -

 

        



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   वेदगंगेवरील  कोल्हापुरी पद्धतीचा सुप्रसिद्ध असा देशातील पहिला बंधारा.त्याने पन्नाशी केंव्हाच ओलांडली आहे.नदी पलिकडच्या पाच सहा गावांना आणि मोठ्या कागल रस्त्याला जोडतो.त्यामुळे मुरगूड शहराकडे होणारी बरीचशी वाहतूक या बंधाऱ्या वरून होत असते. शिवाय शेकडो विद्यार्थी ,विद्यार्थिनी दुचाकी वरून येण्यासाठी हाच जवळचा मार्ग निवडतात.हा इतका महत्वाचा बंधारा कचऱ्याने भरून गेलाय.इतका की गळा दाबून श्वास रोखावा तशी त्याची अवस्था झाली आहे.

   

कचऱ्याचे स्वरूप सुध्दा इतके विचित्र की तो काढून टाकायचा तरी मोठी कसरत करावी लागेल. प्लास्टिक च्या बाटल्या आणि पिशव्या,लाकडे, पाला पाचोळा, सांडपाणी आणि त्यातून येणारे जीव जंतू बंधाऱ्याच्या खोलगट भागात येऊन अडकले आहेत.पुढे जाणारे पाणी तर थांबलेच पण मागे साचलेले पाणी सुध्दा प्रदूषित झाले.ते पाणी जनावरे पितात.लहान मुले,मोठी माणसे त्यातच पोहतात ,डुबक्या मारतात.यंत्राने काढता न येणारा कचरा मुरगूडच्या  शिवभक्तांनी अक्षरशः स्कुबा डायव्हिंग पध्द्तीने काढला.श्वास घेण्यासाठी तेवढे वर यायचे.कडाक्याच्या थंडीत स्विमिंग किट चढवून खोल पाण्यात त्यांनी उड्या घेतल्या आणि साडे चार तासात बंधारा साफ केला.

  

 नगरपरिषद ,कुरणी ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक केले.प्रदूषित पाण्याचा धोका या दोन गावांना जास्त होता. पाण्यावर तवंग होता,दुर्गंधी सुटली होती. तरुणांनी कसलीही जीवाची पर्वा न करता कचरा साफ केला आहे.मध्यंतरी वेदगंगा पात्रात निढोरी जवळ मगर आढळली होती.त्याची सुध्दा भिती न बाळगता खोल पाण्यात उतरून बंधारा साफ करण्यात आला आहे.सर्वत्र या मुलांचे कौतुक होत आहे.

  

या मोहिमेत सहभागी झालेल्या युवकांची नावे याप्रमाणे...

सर्जेराव भाट, सर्प मित्र रघुनाथ बोडके,ओंकार पोतदार,तानाजी भराडे,विशाल कापडे,जगदीश गुरव,इत्यादी.




         ------------------------------------