मुलांना घर किंवा शाळेत बंदिस्त ठेवू नये ; मनसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

Kolhapur news
By -

 


                


'सायन्स डायरेक्ट' या शैक्षणिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कौटुंबिक सुट्टी पालक आणि मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. मुलांना नवीन ठिकाणे शोधण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांची शिकण्याची क्षमता वेगाने विकसित होते. त्यामुळे मुलांना घर किंवा शाळेत बंदिस्त ठेवू नये.


मुलांना नवीन ठिकाणे एक्सप्लोर करू द्या... 


मुलांसाठी अभ्यासाइतकाच बाहेरचा प्रवासही महत्त्वाचा आहे. यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येपासून दूर जाण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची आणि त्यांच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळते.


ब्रिटीश बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्गोट संडरलँड यांनी मुलांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये त्यांनी मुलांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक वाढीसाठी प्रवास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे वर्णन केले आहे.


कौटुंबिक सुट्टी मुलांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे


सुट्टी जीवनात महत्वाची भूमिका बजावते. आपल्या सर्वांच्या बालपणीच्या सर्वोत्तम आठवणी या सुट्टीच्या वेळीच्या असतात. त्यामुळे मुलांना सुट्टीत नवीन खेळणी किंवा व्हिडीओ गेम देण्याऐवजी त्यांना कौटुंबिक सुट्टीत घेऊन जावे.


01


ते कम्फर्ट झोनबाहेरील जग बघू शकतात


02


काही दिवसांसाठी अभ्यासाचे प्रेशर कमी होते


03


यामुळे तणावमुक्त राहण्यास मदत मिळते


04


कौटुंबिक बंध मजबूत होतात


05


काहीतरी नवे शिकण्याची संधी मिळते


06


त्यांच्यात स्पेशल स्किल्स डेव्हलप होतात


07


नवी संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते


08


आव्हानांचा सामना करण्याची क्षमता वाढते. 


           -------------------------