आदर्श राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल प्रा सुनिल डेळेकर यांचा मुरगुडमध्ये नागरी सत्कार संपन्न

Kolhapur news
By -

 

          


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       मला मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण मुरगुडवासीयांचा आहे असे प्रतिपादन प्रा. सुनील डेळेकर यांनी केले .ते मुरगूड शहरातर्फे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमानिमित्त बोलत होते.    


प्रा.सुनील डेळेकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच 35 वर्ष मुरगुड शहराचे विविध प्रश्न बातमीच्या माध्यमातून मांडल्याबद्ल संत सद्गुरू बाळूमामा यांचे भाकणूककार गुरुमाऊली कृष्णात डोणे यांच्या हस्ते नागरी सत्कार करुन सन्मान करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे  होते .स्वागत ओंकार पोतदार यांनी केले .प्रास्ताविक प्रा .रवींद्र शिंदे यांनी  केले .


 यावेळी अनिल सिद्धेश्वर,दगडू शेणवी,संकेत भोसले यांची अभिनंदनपर भाषणे झाली . सोमनाथ यरनाळकर यांनी आभार मानले. 


       या कार्यक्रमास मुरगुड शहरातील राजकीय, सामाजिक, क्रीडा , व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .यावेळी जीवनराव साळोखे ,जोतिराम सूर्यवंशी, नामदेवराव मेंडके,किरण गवाणकर ,जयसिंग भोसले ,एस व्ही चौगुले, सुहास खराडे, संभाजी अंगज, रणजीत सूर्यवंशी, संतोष भोसले ,विशाल सूर्यवंशी, अमर सनगर, विक्रम गोधडे, दत्ता मंडलिक, बाळकृष्ण खामकर, रामचंद्र सातवेकर, विजय सापळे, बजरंग सोनुर्ले,दिलीप कांबळे,दिलीप गवाणकर, राजू भाट, अँथोनी बारदेस्कर ,दिलीप गवाणकर ,तानाजी भराडे, सर्जेराव भाट, प्रकाश पारिशवाड,संकेत शहा, जगदीश गुरव, अनुबोध गाडगीळ, महादेव वागवेकर, प्रशांत सिद्धेश्वर, शिवाजी चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


         ---------------------------------------