घरफाळा व पाणीपट्टी वरील व्याज आकारणी मुळे मुरगूड मध्ये नागरिकांत तीव्र नाराजी.

Kolhapur news
By -

 



                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


घरफाळा व पाणीपट्टी यावर व्याज आकारणी केल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

    नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की नगरपरिषदेने नागरिकांना  सुविधा पुरवाव्यात यासाठी कर आकारले जातात.यावर्षी जवळजवळ ६ महिने पावसाळा होता.पाण्याची टंचाई नसतांना फक्त २० ते२५ मिनिटे पाणी पुरवले जाते.मोठा बाजार भरत असून ही महिलांसाठी साधे स्वच्छता गृह पण नाही.

    कर भरण्यास ३१ मार्च पर्यंत मुदत आहे मग दंड व्याज का भरायचे ? आम्हीं काय कर्ज काढले आहे का ? असे प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत.

   मुख्याधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितले की वरिष्ठ कार्यालयाला याबाबत आपण कळवतो .असे आदेश वरून असतात असे त्यांनी सांगितले.

     या बाबत कांहीं नागरिकांनी सांगितले की आम्हीं सामंजस्याने प्रश्न मांडला आहे.कर व व्याज आकारणी यावर कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात वादावादी व मारहाणीचे प्रकार घडत असल्याचा बातम्या टीव्ही वर व वृत्तपत्रातून येत आहेत.त्यात त्या नगर परिषदेची व शहराची पण बदनामी होते.

    नगरपरिषद ही छोटी स्थानिक स्वराज्य संस्था असून ती लोकशाही पद्धतीनेच चालली पाहिजे.सुविधा न देता नुसते व्याज आकारून कर वसूल करणे हे यात बसत नाही.

    निवेदनावर पुढील मान्यवर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,माजी.उपनगराध्यक्ष दगडु शेणवी व जयसिंग भोसले,शिवभक्त सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,जगदीश गुरव,शुभम वंडकर,संग्राम साळोखे,गौरव साळोखे,निशांत जाधव,संकेत शहा निखिल कलगुटकी,विनायक मोरबाळे,श्रीकांत सावर्डेकर इत्यादी.

       

      -------------------------------------------