कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शेतकरी सह.दूध व्यवसायिक संस्था मर्या. चिखली.ही संस्था म्हणजे चिखलीची ओळख आणि भूषण आहे.चिखलीची अर्थवाहिनी असणारी ही संस्था मातृसंस्था आहे.आणि म्हणूनच तमाम चिखलीतील दूध व्यवसायिकांचे हित लक्षात घेऊन, राजकारण बाजूला ठेवून, तमाम सभासदांच्या हिताला प्राधान्य देत आज संस्थेची चेअरमन निवड झाली.
नूतन चेअरमन म्हणून अरूण गोपाळा काईंगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सुशांत पोवार यांनी सुचवलेल्या या नावाला दादासो चिखलीकर यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन महादेव संकपाळ,उत्तम पाटील,सुरेश गळतगे,धीरज मगदुम, हरी कुंभार ,कल्पना गळतगे, अरूणा गळतगे हे संचालक उपस्थित होते.
या सर्व घडामोडी मध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे सर्वसमावेशक प्रमुख नेते प्रविणदादा भोसले, सदाशिव तुकान, राजेंद्र नुल्ले, बाळकृष्ण काईंगड, विनायक तुकान, यशवंत पाटील , महमद मुल्लाणी, श्रीशैल नुल्ले, अविनाश मगदुम, मल्लया जंगम, बाबुराव वाडकर, दिपक गळतगे, महेश संकपाळ, कृष्णात मगदुम आदी उपस्थित होते.
-------------------